35.6 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeराष्ट्रीयमालगाडीच्या चाकात अडकलेल्या चिमुकल्याचा १०० किमीचा प्रवास

मालगाडीच्या चाकात अडकलेल्या चिमुकल्याचा १०० किमीचा प्रवास

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक चिमुकला रेल्वे स्टेशनजवळ खेळता-खेळता मालगाडीवर चढला आणि तेवढ्यात गाडी सुरू झाली. यामुळे तो खाली उतरू शकला नाही आणि गाडी थेट १०० किमी दूर थांबली. अखेर रेल्वे सुरक्षा दलाच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलाची सुटका केली. सध्या तो मुलगा चाईल्ड केअर सेंटरमध्ये आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनौमध्ये रेल्वे रेल्वे स्टेशनजवळ राहणारा एक ८-१० वर्षांचा मुलगा खेळता-खेळता मालगाडीच्या चाकांमध्ये जाऊन बसला. यानंतर मालगाडी सुरू झाली, ज्यामुळे मुलाला खाली उतरता आले नाही. अशा प्रकारे मालगाडीच्या चाकांमध्ये अडकून पडला आणि थेट लखनौपासून १०० किमी दूर असलेल्या हरदोईपर्यंत पोहचला. मुलगा चाकात अडकल्याची माहिती रेल्वेला लागल्यानंतर हरदोईमध्ये वाहन थांबवण्यात आले.

यानतंर हरदोई रेल्वे संरक्षण दलाला ही माहिती देण्यात आली. हरदोई रेल्वे स्थानकावर मालगाडी थांबवून रेल्वे सुरक्षा दलाने मुलाची सुटका केली. यानंतर त्या मुलाला हरदोई चौकीत आणले. मुलाची जेव्हा सुटका करण्यात आली, तेव्हा तो खूपच घाबरला होता. चौकशीत मुलाने आपले नाव अजय पूरण, रा. बालाजी मंदिर, लखनौ असल्याचे सांगितले. मुलाचे नाव आणि पत्ता विचारल्यानंतर बाल संगोपन केंद्राकडे सुपूर्द करण्यात आले आहे. दरम्यान, त्या मुलाला चाकांमधून बाहेर काढतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR