राज्यात हुडहुडी!

मुंबई/ पुणे : प्रतिनिधी
नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर पोहोचताच संपूर्ण महाराष्ट्रात गुलाबी थंडीची जोरदार चाहूल लागली आहे. उत्तरेकडून येणा-या थंड वा-यांमुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत किमान तापमानाचा पारा झपाट्याने खाली घसरला आहे. विदर्भातील गोंदिया येथे राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून, मराठवाड्यातील लातूर (उदगीर – १२.८), पश्चिम महाराष्ट्रातील पुणे (१४) आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक (१३) अंश सेल्सिअस तापमान असून या ठिकाणी हुडहुडी वाढली आहे.

मुंबईत थंडीची चाहूल जाणवू लागली असून, शुक्रवारी सकाळी सांताक्रूझ येथे यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे किमान तापमान १८.९ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. विशेष म्हणजे, यंदाच्या हंगामात प्रथमच शहरातील किमान तापमानाचा पारा २० अंशांच्या खाली घसरला आहे.

दक्षिण बंगालच्या उपसागरात शुक्रवारी पहाटे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता तयार झालेले हे कमी दाबाचे क्षेत्र सकाळी ८.३० वाजताही त्याच परिसरात कायम होते. हे क्षेत्र वायव्य दिशेकडे सरकण्याची शक्यता असून, १४ नोव्हेंबरपर्यंत त्याची तीव्रता वाढून ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. १५ नोव्हेंबरच्या सकाळच्या सुमारास या प्रणालीची तीव्रता वाढेल. १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत मध्य बंगालच्या उपसागरावर त्याची तीव्रता वाढून चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. ही प्रणाली पुढे उत्तर-उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे.

भविष्यातील धोक्याची घंटा
मुंबई हे समुद्रकिनारी वसलेले शहर असल्याने येथे अतिथंडी किंवा अतिउष्णतेचा अनुभव तुलनेने कमी असणे अपेक्षित आहे. मात्र, दोन दशकांतील तापमानातील बदल, पावसाचे बदलते स्वरूप लक्षात घेता वाढते तापमान पाहता भविष्यातील संभाव्य संकटाची ही धोक्याची घंटा मानली पाहिजे. दिवसाच्या प्रखर सूर्यप्रकाशामुळे अस्वस्थता आणि दमटपणा जाणवू शकतो. ठाणे, पालघर, रायगड आणि नवी मुंबईमध्येही हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. सध्या या भागांमध्ये पावसाबाबत कोणताही विशिष्ट इशारा देण्यात आलेला नाही.

नाशकात सकाळी थंडी
पुणे आणि नाशिकमध्ये सकाळी आणि रात्री थंडी वाढेल. पुणे आणि नाशिकमध्ये कमाल तापमान सुमारे ३३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये किमान तापमान सुमारे १४ ते १५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्येही सकाळी हलकी थंडी जाणवू शकते. मात्र, दुपारनंतर सूर्यप्रकाशामुळे हवामान उबदार राहील.

नागपूरमध्ये तापमान ३० अंशांपर्यंत पोहोचणार
नागपूरमध्ये शनिवारी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. उपलब्ध हवामान माहितीनुसार, शहरात सुमारे १९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. कमाल तापमान सुमारे ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान सुमारे १९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे

रत्नागिरीत उन्हाचे चटके
राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ३६.१ अंश सेल्सिअस इतके रत्नागिरी येथे नोंदवले गेले, तर सर्वांत कमी किमान तापमान १२.० अंश सेल्सिअस इतके गोंदिया येथे नोंदवले गेले. सांताक्रूझ येथील किमान तापमान सरासरीपेक्षा २.७ अंश सेल्सिअसने कमी होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59
Video thumbnail
Latur Tur Price: तुरीला 10,871 रुपये क्विंटलचा विक्रमी भाव! दुष्काळामुळे आवक घटली
03:04
Video thumbnail
Exclusive Interview|प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांचा जीवनप्रवास! लहानपणापासून मानवता तीर्थपर्यंतचा प्रवास
08:40
Video thumbnail
Latur District Bank Election: मतदार अपहरण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
03:42
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
01:02:37
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
21:37
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43

Latest news