लष्करी रणनीतीत ऐतिहासिक बदल! भारताने पहिल्यांदाच १२ अणूबाँब ठेवले ‘रेडी टू फायर’ स्थितीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): जागतिक शस्त्रास्त्रे आणि सुरक्षा क्षेत्रावर लक्ष ठेवणारी स्वीडनची नामांकित संस्था ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ म्हणजेच ‘सिपरी’ (SIPRI) च्या इयरबुक २०२६ च्या ताज्या अहवालातून भारताच्या लष्करी आणि आण्विक ताकदीबाबत अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, भारताने आपल्या अण्वस्त्र धोरणात मोठा बदल केला असून इतिहासात पहिल्यांदाच शांततेच्या काळात थेट १२ अण्वस्त्रे ‘रेडी टू फायर’ म्हणजेच प्रत्यक्ष कारवाईसाठी तैनात केली आहेत.

आतापर्यंत भारताचे अधिकृत धोरण हे आपली अण्वस्त्रे (वॉरहेड्स) आणि त्यांना वाहून नेणारी प्रक्षेपण प्रणाली (मिसाईल्स) वेगवेगळ्या ठिकाणी साठवून ठेवण्याचे होते. मात्र, बदलत्या जागतिक आणि प्रादेशिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर भारताने हे वॉरहेड्स प्रक्षेपकांशी जोडले असून ते तात्काळ वापरासाठी सज्ज ठेवल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारताची अण्वस्त्र क्षमता १९० वर; पाकिस्तान मागे पडला
सिपरीच्या अहवालानुसार, भारताने आपल्या अण्वस्त्रांच्या एकूण साठ्यात वाढ केली असून हा आकडा आता १९० वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, इतिहासात पहिल्यांदाच भारताने अण्वस्त्रांच्या संख्येत आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला मागे टाकले आहे; सध्या पाकिस्तानकडे एकूण १७० अण्वस्त्रे असून त्यातील एकही अण्वस्त्र प्रत्यक्ष तैनात स्थितीत नाही. भारताचे हे आधुनिकीकरण प्रामुख्याने चीनचे आव्हान लक्षात घेऊन केले जात आहे. चीनने देखील आपल्या तैनात अणुबॉम्बची संख्या २०२५ मधील २४ वरून आता ३४ वर नेली असून चीनकडे एकूण ६२० अण्वस्त्रांचा मोठा साठा आहे.

समुद्रातून शत्रूचा विनाश करण्याची ताकद
अहवालातील दाव्यानुसार, भारताने ‘आयएनएस अरिहंत’ आणि ‘आयएनएस अरिघात’ या आपल्या अणू पाणबुड्यांवर (SSBN) ही अण्वस्त्रे तैनात केली असावीत, ज्या सध्या समुद्रात गस्त घालत आहेत. भारताचे अधिकृत धोरण “नो फर्स्ट युज” (आधी अण्वस्त्र हल्ला न करणे) असे आहे. त्यामुळे जर शत्रू देशाने भारतावर पहिला अणू हल्ला केला, तरीही समुद्रात लपलेल्या या पाणबुड्यांमधून शत्रूचा पूर्णपणे विनाश करण्याची अफाट क्षमता (सेकंड स्ट्राईक कॅपेबिलिटी) भारताने निर्माण केली आहे. याशिवाय ‘एमआयआरव्ही’ (MIRV) आणि कॅनिस्टर तंत्रज्ञानामुळे एकाच मिसाईलवरून एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या लक्ष्यांवर अचूक मारा करणे भारताला शक्य झाले आहे.

जागतिक स्तरावर अण्वस्त्रांची स्थिती
सिपरीच्या २०२६ च्या अहवालानुसार, सध्या जगभरात एकूण १२,१८७ अण्वस्त्रे आहेत, ज्यापैकी ९,७४५ अण्वस्त्रे लष्करी साठ्यात असून ४,०१२ अण्वस्त्रे विविध देशांनी तैनात केली आहेत. जगातील एकूण नऊ देशांकडे (अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इस्रायल) अण्वस्त्रे आहेत. यामध्ये अमेरिका आणि रशियाकडे सर्वाधिक अण्वस्त्रांचा साठा असून त्यांची हजारो अण्वस्त्रे हाय-अलर्टवर तैनात आहेत. आशियाई क्षेत्रातील वाढता तणाव पाहता भारत आता चीनच्या संपूर्ण भूभागावर लक्ष केंद्रित करू शकणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र प्रणालींचा विकास वेगाने करत असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
धावत्या बाईकस्वाराला पाडणे पडले महागात; लातूरमध्ये 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर ट्रॅफिक पोलीस निलंबित!
00:19
Video thumbnail
Latur|अण्णा हजारेंचा 90 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
02:13
Video thumbnail
Latur|लातूरच्या नाट्यगृहाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर;अर्धवट नाट्यगृहाचे काम महिन्यांपासून ठप्प
04:14
Video thumbnail
शेकडो शेतकरी रस्त्यावर;महावितरणच्या अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्याने कासेगावचे आंदोलन तूर्तास मागे
00:37
Video thumbnail
Latur|MIDC मधील आग विझविण्यासाठी युद्धपातळीवरील प्रयत्न
04:07
Video thumbnail
Latur|साडेचार कोटींचे बसस्थानक तयार;तरी प्रवाशांना गळक्या शेडमध्येच थांबावे लागते!
01:22
Video thumbnail
Latur|वीज कोसळून बैल दगावला; शेतकरी दांपत्य स्वतःच ओढते नांगर#marathilivenews #maharashtranews
01:40
Video thumbnail
Latur|15 तास उलटले तरी आग विझेना; लातूर एमआयडीसीत अग्निशमन दलाची झुंज सुरू!
03:18
Video thumbnail
Nanded|नांदेड शहरातील प्री अक्षरा शाळेच्या गोडाऊनला आग;सुदैवाने जीवितहानी टळली
00:54
Video thumbnail
Latur Accident|दुचाकी स्लीप झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू; घटनेचा थरारक सीसीटीव्ही समोर
00:42
Video thumbnail
Latur Breaking|MIDC मधील नामांकित कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
02:07
Video thumbnail
Latur|लातूर एमआयडीसी मध्ये नामांकित कंपनीला भीषण आग; आगीत लाखोच साहित्य जळून खाक
00:15
Video thumbnail
बारामतीत सुनेत्रा पवारांचा 'राऊंड'; रुग्णालयातील अनागोंदी कारभारावरून कर्मचाऱ्यांची काढली खरडपट्टी!
00:57
Video thumbnail
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा हाहाकार! जोरदार धक्क्यांनी इमारती हादरल्या; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
01:12
Video thumbnail
सासू झाली नवरी अन् जावई झाला नवरा! उत्तर प्रदेशातील 'या' अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल
00:56

Latest news