यादीतील शेतक-यांसाठी आधार ‘केवायसी’ अनिवार्य

मुंबई : आतापर्यंत १७ लाखांहून अधिक पात्र शेतक-यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून यादीत नाव आल्यावर पात्र शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. लवकरच शेतक-यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम हस्तांतरीत होणार आहे. गरजू आणि आर्थिक अडचणी सापडलेल्या शेतक-यांसाठी ही कर्जमाफी योजना आहे. त्यातून ९६ हजार करदात्या शेतक-यांना आणि इतर अपात्र अशा जवळपास दीड लाख शेतक-यांना कर्जमाफी योजनेतून बाद करण्यात आले आहे. त्यांच्या अकाऊंटमध्ये छदामही जमा होणार नाही. सध्या तांत्रिक अडचण दूर करण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन दिवसांत पात्र शेतक-यांच्या खात्यात कर्जमाफीचा पैसा जमा होणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

शेतकरी कर्जमाफीची सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असतानाच तांत्रिक अडचणीने मोठा खोडा घातला. दोन दिवसांत शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण ते हवेतच विरले. आता पुढील दोन दिवसांत पात्र शेतक-यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ही महत्त्वाची माहिती कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यापूर्वी तांत्रिक अडचणीचा मुद्दा समोर आणला होता. ४ ऑगस्ट रोजीपासून कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरूवात होणार होती. पण अडथळा आल्याने शनिवारी अथवा रविवारी कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होईल. राज्यातील ५६ लाख शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल.

आतापर्यंत १२ लाख शेतक-यांची ई-केवायसी पूर्ण
पहिल्या टप्प्यात कमी रक्कम तर दुस-या टप्प्यात मोठ्या शेतक-यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. युद्धपातळीवर ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १२ लाख शेतक-यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसांत शेतक-यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येईल असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. कर्जमाफीच्या तीन याद्या जाहीर होणार आहे. ज्यांची पहिल्या यादीत नावे आली नाहीत. त्या शेतक-यांनी संयम बाळगावा. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल टाकू नये असे आवाहनही भरणे यांनी केले.

तर खत विक्रेत्यांवर कारवाई
अनेक ठिकाणी युरियासोबत विनाअनुदानित खते शेतक-यांच्या माथी मारण्यात येत आहे. ती खरेदीची दुकानदार सक्ती करत आहेत. याविषयीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी सरकारने शासन परिपत्रक काढले आहे. असा प्रकार करणा-या विक्रेत्यांवर तात्काळ कडक कारवाईचे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.

पहिला हफ्ता वितरित : मुख्यमंत्री
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना घोषित केली होती. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आषाढीला जाहीर केली होती. कुठल्याही अर्जाविना आधार कार्डच्या सहाय्याने शेतक-यांची खाली रिक्त करायचे काम हाती घेतले होते. आज जवळपास ५ हजार २९ कोटी रूपयांचा पहिला हफ्ता ६ लाख २२ जार २०७ शेतक-यांच्या खात्यात गेला आहे. ही खाती रिक्त करण्यात आली आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Jalkot|घागरदऱ्यात हर हर महादेवचा जयघोष; दर्शनासाठी हजारोंची गर्दी
01:40
Video thumbnail
BREAKING : लातूरकरांनो सावधान! मांजरा धरणाची पाणीपातळी चिंताजनक!
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये शिवसेना उबाठाचा सरकारविरोधात एल्गार! गांधी चौकात होणार महाआंदोलन
04:20
Video thumbnail
Nanded|पाऊस नाही, पिके करपली! शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार मदतीची मागणी
01:44
Video thumbnail
Nanded|हातात लग्नाचा बॅनर घेऊन तरुण टॉवरवर! कौटुंबिक त्रासाचा आरोप | लोह्यात खळबळ
00:46
Video thumbnail
Nanded|गणरायाचं विसर्जन करायचं कुठे? नांदेडमध्ये नदी-खदानी कोरड्या | महापालिकेसमोर संकट
02:26
Video thumbnail
Latur|खरगे यांच्या अवमानाविरोधात पुरोगामी संघटना एकवटल्या! गांधी चौकात निषेध सभा
03:14
Video thumbnail
Latur|जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुण टॉवरवर! रेणापूरच्या कोरेगावातील आंदोलन
02:04
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13
Video thumbnail
BIG BREAKING | तिरुका नदीत जळकोटच्या व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
00:57
Video thumbnail
SOLAPUR|पडळकरांचा ताफा अडवला! मराठा आंदोलकांचा थेट सवाल; आरक्षणावर आमदारांनी स्पष्ट केली भूमिका
01:42
Video thumbnail
LATUR|गवळणीच्या सुरांनी लातूर दुमदुमलं! वासुदेव समाजाचा जन्माष्टमी सोहळा थाटात
03:55

Latest news