१५ डिसेंबरपर्यंत दुुसरी नोकरी शोधा

नवी दिल्ली : प्रख्यात जर्मन स्पोर्ट्सवेअर कंपनी अडिडासने भारतातील टेक्नॉलॉजी विभागातील काही पदे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुग्राममधील अडिडासच्या इंडिया टेक हबमध्ये १५ सप्टेंबरला झालेल्या टाउन हॉल बैठकीत कर्मचा-यांना या पुनर्रचनेची माहिती देण्यात आली.

कंपनीने भारतातील टेक विभागातील नोकरकपातीला दुजोरा दिला आहे. मात्र, नेमक्या किती कर्मचा-यांवर याचा परिणाम झाला, हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. अडिडासच्या म्हणण्यानुसार, या पुनर्रचनेचा परिणाम भारतातील टेक्नॉलॉजी विभागातील २० टक्क्यांपेक्षा कमी कर्मचा-यांवर झाला आहे. कंपनीने बदलत्या व्यावसायिक गरजांनुसार आपली कार्यपद्धती अधिक सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

मात्र, या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्राम टेक हबमधील सुमारे ७०० कर्मचा-यांपैकी अंदाजे ३५० किंवा त्याहून अधिक कर्मचा-यांवर परिणाम झाल्याचा दावा केला जात आहे. या आकडेवारीची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही आणि अडिडासनेही या संख्येला दुजोरा दिलेला नाही. नोकरकपात होणा-यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, डेटा सायंटिस्ट आणि डेटा इंजिनिअर्स यांचा समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

कर्मचा-यांची दोन गटांमध्ये विभागणी
बैठकीनंतर कर्मचा-यांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आल्याचे समजते. काही कर्मचा-यांना त्याच दिवशी कंपनी सोडण्यासंदर्भातील पत्रे देण्यात आली. तर दुस-या गटातील कर्मचा-यांना १५ डिसेंबरपर्यंत काम सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या कालावधीत संबंधित कर्मचा-यांना इतर टेक हबमधील सहका-यांकडे आपल्या कामाचा ताबा देण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, कंपनीमध्येच उपलब्ध असलेली दुसरी भूमिका किंवा पद शोधण्यासाठी त्यांना वेळ देण्यात आला आहे.

कंपनीला सज्ज करा
१५ डिसेंबरपर्यंत अंतर्गत पद मिळाले नाही, तर तो त्यांचा शेवटचा कामाचा दिवस असेल, अशी माहिती देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अडिडासने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, व्यवसायाच्या बदलत्या गरजांशी कार्यपद्धती सुसंगत करण्याच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. संस्थेची रचना सुलभ करणे, महत्त्वपूर्ण क्षमता बळकट करणे आणि कंपनीला दीर्घकालीन वाटचालीसाठी सज्ज करणे हा या पुनर्रचनेमागील उद्देश असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|आधी कचरा टाकला... मग त्याच कचऱ्याची केली स्वच्छता! नांदेड महापालिकेचा कारभार चर्चेत
01:23
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
11:55
Video thumbnail
Babasaheb Patil|खरीप पिकांच्या नुकसानीवर सरकारचा प्लॅन काय? सहकारमंत्र्यांनी दिलं उत्तर
01:37
Video thumbnail
Latur|जळकोटच्या स्वातंत्र्यसैनिकांचा निजामाविरोधातील लढा आजही इतिहासात जिवंत
02:50
Video thumbnail
Latur|मांजरा धरणातून पाणी चोरीचा धक्कादायक प्रकार
04:05
Video thumbnail
Latur|डॉ. विजयकुमार यादव यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील श्रीगणेशाची आरती
01:39
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन; हुतात्म्यांना मानाचा मुजरा
00:50
Video thumbnail
Renapur|हातभट्टीच्या अड्ड्यांवर रेणापूर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!
01:46
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणावर शिवेंद्रराजे भोसले स्पष्ट बोलले; ‘सरकार निर्णय घेणारच नाही असं नाही’
11:32
Video thumbnail
Nanded|35 जणांना एकच जमीन विकली; नांदेड पोलिसांची मोठी कारवाई
02:55
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:52
Video thumbnail
Latur|गणरायाच्या आरतीने एकमत कार्यालय भक्तिमय | धनंजय देशमुख उपस्थित
02:21
Video thumbnail
Nanded|झेंडावंदनावरून नांदेडमध्ये वाद! पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू न देण्याचा इशारा
03:17
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये हेल्मेटचा दणका! 15 दिवसांत 12,561 जणांवर कारवाई
03:13
Video thumbnail
Latur|झाडात अवतरले गणराय! ‘ग्रीन लातूर’चा अनोखा गणेशोत्सव
03:29

Latest news