36.9 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रदत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत आहे. पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार सामना लोकसभेला होत आहे. यामुळे हा मतदारसंघ महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापुरात आमदार दत्ता भरणे यांच्यावर मतदारांना धमकी दिल्याचा आरोप आहे. दत्ता भरणे यांच्या धमकीमुळे मतदानादरम्यान राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच, नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी दत्ता भरणे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यामुळे दत्ता भरणे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीत सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, दत्ता भरणे त्यांच्या गावातील आणि आसपासच्या गावांतील लोकांना शिवीगाळ करून धमकावत आहेत. या घटनेचा व्हीडीओ सुप्रिया सुळे यांनी मुख्य निवडणूक अधिका-यांकडे पाठवला आहे.

दत्ता भरणे यांचा हा धमकीचा व्हीडीओ पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी गंभीर आरोप केले आहेत. आमदार रोहित पवार यांनी एक व्हीडीओ ट्विट केला आहे. या व्हीडीओत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे कार्यकर्त्यांना बोलत असल्याचे दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये पवार यांनी भरणेंवर धमकी दिल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हीडीओ समोर आल्यानंतर भरणे यांनी ‘मी दोन कार्यकर्त्यांमधील वाद सोडवत होतो’ असे स्पष्टीकरण दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR