29.4 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeसोलापूरमोदी, ठाकरे, पवारांनंतर मनोज जरांगेही सोमवारी सोलापुरात

मोदी, ठाकरे, पवारांनंतर मनोज जरांगेही सोमवारी सोलापुरात

सोलापूर : लोकसभा निवडणुकीमुळे सर्वत्र सर्वपक्षीय राजकारण्यांच्या तोफा सभांमधून धडाडत आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभा एकाच दिवशी म्हणजे सोमवारी (ता. २९ एप्रिल) होणार आहेत. त्यातच आता मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील हेही सोमवारी सोलापूरमध्ये येत आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे सोमवारी सोलापूर हा सभांचा हॉटस्पॉट होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे सोमवारी (ता. २९ एप्रिल) सायंकाळी पाच वाजता मरिआई चौक येथे आगमन होणार आहे. मराठा समाजाच्या वतीने त्यांचे त्या ठिकाणी भव्य असे स्वागत करणार आहोत. स्वागत स्वीकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे पुढे मंगळवेढा, सांगोला, सांगली मार्गे बेळगाव येथे जाणार आहेत. त्या ठिकाणी ते जाहीर सभा घेणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिली.

मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच ज्यांना पाडायचे आहे, त्यांना पाडा, असा सूचक संदेश मराठा समाजाला दिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये येत असलेले मनोज जरांगे पाटील हे सोलापूरमध्ये मराठा समाजाला कोणाला पाडण्याचा संदेश देणार आहेत, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR