22.3 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeपरभणीआषाढी महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी आनंद भरोसे

आषाढी महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी आनंद भरोसे

परभणी : सांस्कृतिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणा-या परभणीमध्ये आषाढी महोत्सवाचे भव्य आयोजन होणार आहे. या आषाढी महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी आनंद भरोसे यांची सर्व कलावंतांच्या वतीने सर्वांनूमते निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील कलावंतांचा मेळा रंगणार असून या महोत्सवासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री उपस्थित राहणार आहेत.

या अनुषंगाने परभणीतील विविध क्षेत्रातील कार्यरत कलावंतांचा या महोत्सवात सत्कार करण्यात येणार आहे. या बैठकीत परभणीतील कलावंतांनी आपले प्रलंबित प्रश्न मांडले. कलावंतासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, नटराज रंग मंदिराचे पुनर्जीवन करणे, परभणी शहरामध्ये एक अँम्पी थेटरची निर्मिती करणे, नवीन होऊ घातलेल्या नाट्यगृहासाठी निधी उपलब्ध करून देणे, महिला कलावंत मानधनासाठी वयाची अट कमी करणे आदी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी भरोसे यांनी सर्व कलावंतांना वरील सर्व मागण्या शासन स्तरावरून मान्य करण्याचे आश्वासित केले.

असा रंगणार आषाढी महोत्सव
परभणीत होणा-या आषाढी महोत्सवासाठी समितीचे गठन करण्यात येणार असून विविध सांस्कृतिक कला या निमित्ताने सादर होणार आहेत. नृत्य, नाट्य, गायन आदी कलांचे रंगतदार सादरीकरण या निमित्ताने परभणीत होणार असून सांस्कृतिक रसिकांसाठी ही मेजवानी ठरणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने प्राथमिक बैठक परभणी येथे संपन्न झाली. यावेळी बैठकीस ज्येष्ठ रंगकर्मी प्रा.रविशंकर झिंगरे, किशोर पुराणिक, संजय पांडे, विनोद डावरे, प्रमोद बल्लाळ, पंकज खेडकर, प्रा. उदय वाईकर, डॉ सिद्धार्थ मस्के, डॉ सुनील तुरुकमाने, प्रकाश बारबिंड, उमेश शेळके, मधुकर उमरीकर, प्रविण वायकोस, पांडुरंग पांचाळ, माणिकराव सुक्ते, छगन लबडे, विशाल उफाडे, शेख जावेद, कार्तिक खरे, राजेभाऊ चव्हाण, छायाताई मोगल, डॉ.अर्चना चिक्षे, लक्ष्मी लहाने, इंदुताई जाधव, मनीषा उमरीकर, आशाताईं कुलकर्णी, अनुराधा वायकोस, मिनाक्षी शेळके, संगीता भैरट, लक्ष्मीबाई डोंगरे, रंजना गायकवाड, कांचन लबडे, निलावती चित्रे, अश्विनी नांदे, मुक्ता दासरे आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR