27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयअंजू खास उद्देशाने भारतात

अंजू खास उद्देशाने भारतात

नवी दिल्ली : पाकिस्तानी नसरुल्लाहच्या प्रेमासाठी भारतातूनपाकिस्तानात गेलेली अंजू मायदेशी परतली आहे. अंजूने बुधवारी अटारी-वाघा सीमेवरून भारतात प्रवेश केला. मित्राला भेटण्यासाठी अंजून सहा महिन्यांपूर्वी टुरिस्ट व्हिसावर पाकिस्तानला गेली होती. आता अंजू परत का आली? ती कायमची भारतात आली आहे की, पाकिस्तानात परतणार आहे? तिचा भारतात येण्याचा उद्देश काय? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले आहेत. स्वत: अंजूने या प्रश्नांचा खुलासा केला आहे.

पंजाबमध्ये आयबी आणि राज्य पोलिसांच्या गुप्तचर विभागाने अंजूची अनेक तास चौकशी केली, यावेळी अनेक खुलासे झाले. चौकशीदरम्यान अंजूने सांगितले की, ती २१ जुलै रोजी पाकिस्तानला गेली होती. पाकिस्तानी नागरिक असलेल्या नसरुल्लासोबत लग्न करण्यापूर्वी तिने ख्रिश्चन धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारल्याचा खुलासाही तिने केला. त्यानंतर तिने इस्लामिक रितीरिवाजांनुसार नसरुल्लाशी लग्नही केले. मात्र, चौकशीदरम्यान अंजूने लग्नाशी संबंधित कोणतेही कागदपत्र दाखवले नाही.

पाक लष्कराशी संबंध नाही
आयबी आणि पोलिसांनी अंजूची पाकिस्तानी सैन्यासोबतच्या संबंधांबद्दल चौकशी केली, ज्यात तिने सांगितले की तिचा पाकिस्तानी सैन्याच्या कोणत्याही कर्मचा-यांशी संबंध नाही किंवा ती सैन्यात कोणाला ओळखत नाही. अंजूबाबत सर्वसामान्यांच्याच नव्हे तर पोलिसांच्याही मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत, हे विशेष.

पतीला घटस्फोट देऊन पाकला परतणार
पोलिसांनी अंजूला पाकिस्तानात परत जाण्याबाबतही विचारणा केली. त्यावर उत्तर देताना अंजूने सांगितले की, ती पती अरविंदला घटस्फोट देण्यासाठी भारतात आली आहे. या काळात ती आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR