34.7 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा अन् ओबीसी यांच्यात वाद लावण्याचे काम सुरू

मराठा अन् ओबीसी यांच्यात वाद लावण्याचे काम सुरू

मुंबई : ‘मराठा विरुद्ध ओबीसी यांचा वाद लावण्याचे काम सुरू आहे,’ असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर केला आहे. दुस-या टप्प्यात होणा-या मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.

पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या, दरम्यान, महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

मराठा बांधव आरक्षणाची मागणी करत आहेत. मराठा बांधवांचा विधीवत लढा सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. ४० दिवसांत कुठलाच निर्णय झाला नाही, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR