31.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयअ‍ॅस्ट्राझेनेकाने जगभरातून कोविड लसीच्या खरेदी -विक्रीवर घातली बंदी

अ‍ॅस्ट्राझेनेकाने जगभरातून कोविड लसीच्या खरेदी -विक्रीवर घातली बंदी

नवी दिल्ली : ब्रिटिश फार्मा कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाने जगभरातून कोविड-१९ लसीची खरेदी आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भारतात बनवलेली कोविशील्ड लस देखील आहे. अ‍ॅस्ट्राझेनेकाने २०२० मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने कोरोना लस तयार केली होती. त्याचा फॉम्युर्ला वापरून पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने भारतात कोविशील्ड नावाची लस तयार केली होती.

काही दिवसांपूर्वी अ‍ॅस्ट्राझेनेकानेही या लसीचे काही दुष्परिणाम असल्याचे मान्य केले होते. अ‍ॅस्ट्राझेनेका लस भारतात कोविशील्ड या नावाने वापरली जात होती. मात्र, कंपनीने ही लस बाजारातून काढून टाकण्यामागे आणखी काही कारणे दिली केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते, भारतात आतापर्यंत २२० कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. मात्र, आता या लसीवर बंदी घातल्यामुळे कोविशील्ड लसीचा डोस घेणा-या भारतीय नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

कोविशील्ड ने युरोप आणि जगातील इतर देशांमधून कोरोनाची लस परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील सीरम इन्स्टिट्यूटने अद्याप असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. भारतातही कोविशील्डबाबत चिंता व्यक्त केली जात असून याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून या लसीच्या सुरक्षेबाबत सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे.सुप्रीम कोटार्नेही सुनावणीसाठी सहमती दर्शवली आहे, मात्र अद्याप तारीख ठरलेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR