16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडाऑसींचा विजय; इंग्लंडची पराभवाची षष्ठी

ऑसींचा विजय; इंग्लंडची पराभवाची षष्ठी

अहमदाबाद : ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप स्पर्धेत शनिवारी गतविजेत्या इंग्लंडवर विजय मिळवून उपांत्य फेरीच्या दिशेने मोठी झेप घेतली. इंग्लंडचा हा ७ सामन्यांतील सहावा पराभव ठरला आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. वर्ल्ड कपमधील अव्वल ७ संघ २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये होणा-या चॅम्पियन्स ट्रÞÞॉफीत खेळणार आहेत आणि इंग्लंडने तीन संधी गमावली. हा त्यांच्यासाठी दुहेरी धक्का ठरला. ऑस्ट्रेलियाने १० गुणांसह तिसरे स्थान मजबूत केले आहे आणि त्यांना अफगाणिस्तान ( ७ नोव्हेंबर) व बांगलादेश ( ११ नोव्हेंबर) यांचा सामना करायचा आहे.

इंग्लंडच्या ख्रिस वोक्स ( ४-५४), मार्क वूड ( २-७०) आणि आदील राशीद ( २-३८) यांच्या मा-यासमोर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४९.३ षटकांत २८६ धावांवर माघारी पाठवले. ट्रॅव्हीस हेड ( ११) व डेव्हिड वॉर्नर ( १५) यांच्या विकेटनंतर स्टीव्ह स्मिथ ( ४४) व मार्नस लाबुशेन ( ७१) यांनी तिस-या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. मधल्या षटकांत ऑस्ट्रेलियाने पुनरागमन केले होते, परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्यांना पुन्हा बॅकफूटवर फेकले. कॅमेरून ग्रीन ( ४७) व मार्कस स्टॉयनिस ( ३५) यांनी चांगली फटकेबाजी केली. शेवटच्या षटकात अ‍ॅडम झम्पाने २९ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. मिचेल स्टार्कने पहिल्याच चेंडूवर जॉनी बेअरस्टोला झेलबाद केले. त्यानंतर स्टार्कच्या गोलंदाजीवर जो रूटचा सोपा झेल स्टॉयनिसने टाकला. पाचव्या षटकात स्टार्कने ही विकेट मिळवलीच, परंतु त्याचे श्रेय पॉईंटला उभ्या असलेल्या लाबुशेनला जाते. चेंडू बॅटच्या बाजूने यष्टिरक्षकाच्या हाती विसावला, परंतु कोणीच अपील नाही केले. लाबुशेनने झेल घेण्यास भाग पाडले अन् रूटला ( १३) माघारी जावे लागले. बेन स्टोक्स व डेवीड मलान यांनी १०८ चेंडूंत ८४ धावा जोडून इंग्लडच्या आशा पल्लवीत केल्या. पॅट कमिन्सने ही भागीदारी तोडली आणि मलान ६४ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ५० धावांवर बाद झाला.

कर्णधार जॉस बटलर (१) अपयशी ठरला अन् अ‍ॅडम झम्पाने त्याला बाद केला. धावा व चेंडू यांच्यातले अंतर सातत्याने वाढत चालले होते. स्टोक्स व मोईन अली यांनी ६३ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर फेकण्याचा केलेला प्रयत्न फसला. झम्पाने ३६व्या षटकात स्टोक्सला(६४) बाद केले. पॅट कमिन्सने इंग्लंडच्या लिएम लिव्हिंगस्टोनला बाद करून मॅच एकाबाजूने झुकवली. त्यात झम्पाने आणखी एक सेट फलंदाज मोईन अली (४२) याची विकेट मिळवून ऑस्ट्रेलियाचा विजय जवळपास निश्चित केला. झम्पाने १०-०-२१-३ असा प्रभावी स्पेल टाकला. डेव्हिड विली ( १५) याला हेझलवूडने बाद केले. आदील राशीद आणि ख्रिस वोक्स (३२) यांच्या ३७ धावांच्या भागीदारीने इंग्लंडसाठी संघर्ष केला, पण मार्कस स्टॉयनिसने नववा झटका दिला. हेझलवूडने शेवटची विकेय घेऊन इंग्लंडचा संपूर्ण संघ २५३ धावांत पाठविला आणि ३३ धावांनी विजय मिळविला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR