36 C
Latur
Wednesday, March 25, 2026
Homeक्रीडाविश्वचषकातून ऑस्ट्रेलिया बाहेर

विश्वचषकातून ऑस्ट्रेलिया बाहेर

झिम्बाब्वे सुपर-८ मध्ये

कँडी : २०२१ ची चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या लीग राऊंडमधूनच बाहेर पडली आहे. मंगळवारी झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. कँडी येथील पल्लेकेले स्टेडियममध्ये सामन्याचा टॉसही होऊ शकला नाही. याचबरोबर झिम्बाब्वे सुपर-८ मध्ये पोहोचला आहे.

एक दिवसापूर्वी कांगारू श्रीलंकेविरुद्ध ८ विकेट्सने हरले होते. त्यांना १३ फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेने २३ धावांनी हरवले होते. आता ऑस्ट्रेलियाला २० फेब्रुवारी रोजी ओमानशी खेळायचे आहे. हा सामना जिंकूनही मिचेल मार्शची टीम पुढील फेरीत पोहोचू शकणार नाही. ऑस्ट्रेलियन टीम या स्पर्धेच्या इतिहासात दुस-यांदा ग्रुप स्टेजमधून बाहेर पडली आहे. यापूर्वी २००९ मध्ये टीम रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली लीग राऊंडमधून बाहेर पडली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR