32.5 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू पोलिसांवर संतापले

मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू पोलिसांवर संतापले

अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा घटकपक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत आपल्या पक्षाचाही उमेदवार मैदानात उतरवला आहे. गेल्या काही दिवसांत बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यात शाब्दिक वाद सुरू असतानाच आज मात्र सायन्स कोअर मैदानातील सभेवरून चांगलाच राडा झाला.

आधी परवानगी मिळाल्यानंतरही आता मात्र भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेचे कारण सांगत पोलीस आम्हाला मैदानात सभा घेऊन देत नसल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी पोलिस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. यावेळी बच्चू कडू यांना राग अनावर झाला होता. बच्चू कडू यांनी मैदानावर उपस्थित असणा-या पोलिस अधिका-यावर आधी प्रश्नांची सरबत्ती केली आणि नंतर त्यांचे पायही पकडले. तसेच कडू यांनी त्यांच्याशेजारी उभ्या असणा-या एका व्यक्तीला मारहाण केली. हा व्यक्ती कोण होता, हे स्पष्ट होऊ शकले नाही.

नेमका वाद काय आहे?
अमरावतीतील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ बुधवार २४ एप्रिल रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची सायन्स कोअर मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, २३ व २४ एप्रिल रोजी हे मैदान प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या उमेदवारांच्या नावे बुंिकग आहे. अस मात्र पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या कारणांनी प्रहार आमदार बच्चू कडू, उमेदवार दिनेश बुब यांना मंगळवारी मैदानाचा ताबा घेण्यास मज्जाव केला. त्यामुळे आमदार बच्चू कडू आणि पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यात चांगलीच जुंपली.

आमदार बच्चू कडू यांनी पोलिस प्रशासन हे भाजपच्या इशा-यावर नाचत असल्याचा आरोप केला आहे. बुधवारी २४ एप्रिल रोजी सायन्स कोअर मैदानावर प्रहार उमेदवारांची सभा आणि रॅली घेणार असल्याची दावा त्यांनी केला. आमच्याकडे मैदानाची अधिकृत परवानगी असताना कायदा व सुव्यवस्था तोडण्याचे काम पोलिस करीत आहे. भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांच्याकडे या मैदानाची परवानगी नसताना गृहमंत्री शहा यांची कशी सभा घेण्यास पोलिस प्रशासन सहकार्य करीत आहे, असा असा सवाल कडू यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR