बकरीदपूर्वी कलकत्ता उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; “गाय किंवा गोवंशाची कुर्बानी ईदचा भाग नाही”, याचिका फेटाळल्या

कोलकाता: पश्चिम बंगालमधील सुवेंदु अधिकारी यांच्या सरकारने १३ मे रोजी एक अधिसूचना जारी केली होती, ज्यामध्ये बकरीदच्या काळात गाय, बैल, वासरू आणि म्हैस यांसारख्या मोठ्या जनावरांच्या वधावर (Slaughter) कडक निर्बंध लादण्यात आले होते. या सरकारी आदेशाला आव्हान देत तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोइत्रा आणि आमदार अखरुज्जमान यांच्यासह अनेकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर सुनावणी करताना मुख्य न्यायमूर्ती सुजॉय पॉल आणि न्यायमूर्ती पार्थ सारथी सेन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला.

न्यायालयाचे मुख्य निरीक्षण आणि आदेश
उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या ‘हनीफ कुरेशी विरुद्ध बिहार राज्य’ या ऐतिहासिक खटल्याचा हवाला देत दोन मोठे आदेश दिले आहेत. गाय, म्हैस किंवा इतर कोणत्याही जनावराची उघड्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास पूर्णपणे बंदी असेल. न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला त्यांच्या अधिसूचनेत तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले. त्यात “गोवंशाची कुर्बानी देणे ही इस्लाममधील अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही” हा नियम स्पष्टपणे नमूद करण्यास सांगितले आहे.

खंडपीठाने नमूद केले की, राज्य सरकारने जारी केलेली अधिसूचना ही न्यायालयाच्या २०१८ मधील एका आदेशाचीच अंमलबजावणी आहे, ज्याला कधीही आव्हान दिले गेले नव्हते. त्यामुळे ७६ वर्षे जुन्या असलेल्या ‘पशुवध नियंत्रण कायदा १९५०’ च्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून आता अंतरीम स्थगिती दिली जाऊ शकत नाही.

याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद काय होता?
याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद करताना सांगण्यात आले की, बकरीदच्या काळात शेळ्या आणि मेंढ्यांच्या किमती गगनाला भिडतात. अशा वेळी गरीब किंवा मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या शेळी खरेदी करणे परवडत नाही. त्यामुळे अनेक कुटुंब एकत्र येऊन मोठ्या जनावराची (बैल किंवा म्हैस) कुर्बानी देतात, जी त्यांना स्वस्त पडते. या नियमांमुळे गरीब मुस्लिमांच्या धार्मिक अधिकारांवर गदा येईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही फटका बसेल, असा दावा टीएमसी नेत्यांनी केला होता. त्यांनी कायद्याच्या ‘कलम १२’ अंतर्गत केवळ बकरीद सणासाठी या नियमात सवलत (Exemption) देण्याची मागणी केली होती.

राज्य सरकारला २४ तासांची मुदत
सर्व याचिका फेटाळून लावल्या असल्या तरी, न्यायालयाने राज्य सरकारला एक पर्याय दिला आहे. याचिकाकर्त्यांनी ‘पशुवध नियंत्रण कायदा १९५० च्या कलम १२’ अंतर्गत सवलतीची जी मागणी केली आहे, त्यावर राज्य सरकारने स्वतः स्वतंत्र निर्णय घ्यावा. “येत्या २७ आणि २८ मे रोजी हा सण साजरा होण्याची शक्यता असल्याने, राज्य सरकारने सवलत देण्याच्या या अर्जांवर पुढील २४ तासांच्या आत आपला अंतिम निर्णय घ्यावा.”

विना प्रमाणपत्र वधास बंदी
सरकारच्या नियमांनुसार, आता राज्यात कोणत्याही मोठ्या जनावराचा (बैल, म्हैस इत्यादी) वध करायचा असल्यास, ते जनावर शेती किंवा प्रजननासाठी निरुपयोगी (Unfit) असल्याचे सरकारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. तसेच हा वध केवळ अधिकृत कत्तलखान्यांमध्येच (Authorized Slaughterhouses) केला जाऊ शकतो. नियमांचे उल्लंघन केल्यास ६ महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास किंवा दंडाची तरतूद आहे.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
शिव ठाकरेच्या अमरावतीतील घरी फराह खान यांची सरप्राईज भेट; शिवच्या आजीच्या हातच्या भाकरीवर मारला ताव
00:31
Video thumbnail
लातूरमध्ये खुराणा ट्रॅव्हल्सच्या धावत्या बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप!
00:35
Video thumbnail
लातूर पॅटर्नचे यश, आव्हाने आणि भविष्य; पहा काय म्हणाले डॉ.सोमनाथ रोडे!
24:00
Video thumbnail
हिंगोलीत डिझेल टंचाईचे संकट! शेतीच्या कामासाठी पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरच्या किलोमीटर लांब रांगा
03:11
Video thumbnail
NEET पेपर फुटी प्रकरण: डॉ. मनोज शिरुरेंच्या पत्नीची CBI कडून कसून चौकशी; धक्कादायक माहिती समोर
03:11
Video thumbnail
उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
09:33
Video thumbnail
लातुरात डॉ. मनोज शिरुरेंच्या नातेवाईकांवर CBI चा छापा; दोन तास चौकशी, मोठी रोकड जप्त!
03:00
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16
Video thumbnail
लातुरात 'सीबीआय'चा तिसरा मोठा दणका! तीन तासांच्या चौकशीनंतर डॉ. मनोज शिरुरेंना पुण्यातून अटक
03:12
Video thumbnail
भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मांडला ठिय्या
02:39
Video thumbnail
लातूर उद्योग भवनमधील प्रा. शिवराज मोटेगावकरचे चार ते पाच प्लॉट्स वादाच्या भोवऱ्यात
03:58

Latest news