29.4 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रमाझ्याशी विश्वासघात म्हणजे सत्यानाश निश्चित

माझ्याशी विश्वासघात म्हणजे सत्यानाश निश्चित

अकलूज : काही पोपटही बोलायला लागले आहेत. तुम्हीच दादा पोपटांना मोठे केले. माझ्याकडे विमानात घेऊन आलात. ते आता अजितदादांवर बोलतात आणि कोणावर बोलतात. रातोरात त्यांना वाटू लागले की ते राष्ट्रीय नेते झाले. राष्ट्रीय नेत्यांसारखे बोलू लागले. त्यांना हे माहिती नाही की, हिच ती जनता आहे. ज्यांनी त्यांना मोठे केले होते. कारण ते संघर्ष करतील, असे वाटले होते. पण त्यांनी संघर्षाच्या ऐवजी समझोता केला. जनता त्यांच्या पाठिशी उभी राहणार नाही. माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अकलूज येथे महायुतीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांच्यावर चौफेर टीका केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, माळशीरसने निर्णय घेतला आहे. चिंता करण्याचे कारण नाही. एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला सांगितली पाहिजे. पवार साहेबांनी यांची दुकानदारी बंद केली होती. संस्था संपल्या होत्या. कारखाने बंद पडले होते. त्यावेळी आमच्याकडे ही मंडळी आली. आम्ही विचार केला, जुनीजानती मंडळी आहे. यांना जवळ केले पाहिजे. यांना जवळ केले. फक्त जवळ केले नाही. राजकारणातही पुनर्वसन केले, कारखान्यातही पुनर्वसन केले.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मोदीजींनी एनसीडीची योजना सुरु केली. तेव्हा यांना सगळं मिळाले. यांना परतफेड करण्याची वेळ आली तेव्हा यांनी पवार साहेबांचा हात धरला. पण हे लक्षात ठेवा, जनतेच्या मनात मोदीजी आहे. वर्षानुवर्षे जी काम होत नव्हती, स्वप्न दाखवले जायचे. ते तुम्ही करुन दाखवलं, म्हणून पवार साहेबांचा तुमचा राग आहे. ते म्हणतात ५ वर्ष निवडून आला. निंबाळकर वि. मोहिते अशी निवडणूक नाही. मोदीजी पंतप्रधान झाले नाहीत तर देशाचे नुकसान होणार नाही. रणजितदादांना मतदान केले तर मोदींना मिळत. अन्य लोकांना केले तर राहुल गांधींना जात. शरद पवारांचे तर अस्तित्वच नाहीये. त्यांचा येणार कोणी नाही. मात्र, १० आले तर काय होणार नाही. या निवडणुकीत दोनच गट आहेत. एका बाजूला विश्वगुरू मोदीजी आहेत. तर दुस-या बाजूला राहुल गांधी आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR