32.6 C
Latur
Tuesday, May 14, 2024
Homeमहाराष्ट्रएकतर माझं कुंकू लावा, नाहीतर त्यांचे तरी

एकतर माझं कुंकू लावा, नाहीतर त्यांचे तरी

बारामती : एकाचे कुंकू लावा माझे तरी, लावा नाहीतर त्यांचे तरी लावा, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.

काही कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांमध्ये कधी शरद पवारांसोबत तर, कधी अजित पवारांसोबत दिसतात, असे सांगत अजित पवारांनी त्या कार्यकर्त्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. मी असा दावा करणार नाही की १०० टक्के कामे झाले. पण आमच्या हातात ज्यावेळेस सूत्र आली, तेव्हा आम्ही शांत बसलो नाही. मी पुन्हा सांगतो, बाबांनो भावनिक होऊ नका असे आवाहनही त्यांनी केले आहे.

काहीजण दादा आले की, दादांच्या पुढे पण हलगी वाजत असतात. फटाके वाजत असतात आणि दादाला दिसेल, असं पुढे चालत असतात आणि दादांची पाठ फिरली आणि दुसरे आले की, त्यांच्याबरोबर असतात, अरे काय चाललंय तुमचं. एकाचे कुंकू लावा माझे तरी, लावा नाहीतर त्यांचे तरी लावा, हे काय लावलाय चाटाळपणा, नेमकं काय करायचं ते ठरवा, असे म्हणत अजित पवारांनी दोन्ही पवारांच्या मागे पुढे फिरणा-या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे. बारामतीत सभेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. अजित पवार यांनी यावेळी म्हटले की, काही झाकून राहत नाही, मी आपल्याला जबाबदारीने सांगतो. त्या ंिनबोडे गावामध्ये घोंगडी बैठक होती, कॅमेरा नव्हता आणि आपल्या भाषेत बोलायला गेलो, काय तिथे करावे, काय धरणात, या वाक्यामुळे माझे वाटोळे झाले. परत कानाला खडाच लावला कॅमेरा असो-नसो सारखे मेंदूला सांगत असतो, नीट बोलायचे शब्द कुठला चुकीचा जाऊन द्यायचा नाही, मुद्दा ब्रेकिंगला द्यायचा नाही असे अजित पवार म्हणाले.

अजित पवारांचे बारामतीकरांना आवाहन
माणूस चुकतो जो काम करतो तो चुकतो. मी बोलतो म्हणून शब्द गेला परंतु कायम गेला नाही त्याकरता माझे तुम्हाला सगळ्यांना सांगणे, आता साहेब उभे नाहीत, मी पण उभा नाही, आम्ही दोघेही नाही आणि त्याच्यामुळे आता चाळीस वर्षांपूर्वी तुमच्या बारामतीत आलेल्या सुनेला द्यायचे का मुलीला द्यायचे, हे तुम्ही ठरवा, असे आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना केले आहे. त्याच्यामध्ये सुनेला मान असतो, लक्ष्मी म्हणून समजतात, कुणाच्याही घरामध्ये सून आली तर सासू काही दिवसांनी तिच्या हातामध्ये चावा देतात ना आणि सगळे आता तू बघ आणि चुकले तर ती सुनेला सांगते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR