सोलापूर : उमेदवारी अर्ज भरण्याच्या करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी भाजपच्या वतीने आपल्या उमेदवारांचे ‘एबी फॉर्म’ अगदी शेवटच्या क्षणी वेगवेगळ्या निवडणूक कार्यात आणण्यात आले. मात्र भाजपने वेळ संपल्यानंतर एबी फॉर्म सादर केले. लोकशाहीची हत्या केली असा आरोप करत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
वेळेत एबी फॉर्म पोहोचवण्यासाठी भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर तसेच अन्य प्रमुख कार्यकर्त्यांची मोठी धावपळ उडाली. दरम्यान वेळ संपल्यानंतर भाजपच्या नेत्यांना एबी फॉर्म देण्यास मूभा दिल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी निवडणूक कार्यालयाबाहेर मोठी घोषणाबाजी केली.
भाजपच्या नेत्यांना कार्यालयात प्रवेश करण्यास अडवण्यात आले. अखेर पोलिस व शीघ्र कृती दलाच्या जवानांना बोलवून भाजपच्या नेत्यांना आपल्या उमेदवारांचे ‘एबी फॉर्म’ देण्यास कार्यालयात सोडण्यात आले.

