तिशीतील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतोय रक्तदाब

नवी दिल्ली : तरुण वयात, विशेषत: तीशीच्या आसपास रक्तदाब किंचित वाढला तरी भविष्यात हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, अशी माहिती एका नव्या संशोधनातून समोर आली आहे. सामान्य समजल्या जाणा-या पातळीत असलेला रक्तदाबही पूर्णपणे सुरक्षित नसून त्यात होणारी वाढ दीर्घकालीन आरोग्यावर परिणाम करू शकते, असे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

या संशोधनात सुमारे ६,००० प्रौढ व्यक्तींचा २० वर्षांहून अधिक काळ अभ्यास करण्यात आला. त्यातून असे आढळले की सिस्टोलिक रक्तदाबात प्रत्येक १० एमएम एचजी वाढ झाल्यास हृदयविकाराचा धोका सुमारे २० ते २२ टक्क्यांनी वाढतो. हा अभ्यास अमेरिकन जरनल ऑफ हायफरटेंशनमध्ये प्रसिद्ध झाला असून या निष्कर्षांमुळे तरुण वयातील रक्तदाबाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. विशेष म्हणजे, हा धोका पुरुष आणि महिलांमध्ये समान प्रमाणात आढळला असून तरुणांमध्ये हा मुद्दा अनेकदा दुर्लक्षित राहतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

दिल्लीतील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मोहित गुप्ता यांनी सांगितले की, रक्तदाबाचा धोका फक्त १४०/९० नंतरच सुरू होतो, हा समज आता चुकीचा ठरला आहे. रक्तवाहिन्यांवरील परिणाम यापेक्षा खूप आधी सुरू होतात. रक्तदाब हा ठराविक मर्यादेवर थांबत नाही, तर तो सतत वाढणारा जोखमीचा घटक आहे. मात्र या निष्कर्षांबाबत घाईघाईने निष्कर्ष काढू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले, दीर्घकालीन कालावधीत २० टक्के वाढ हा सापेक्ष धोका आहे. निरोगी ३० वर्षीय व्यक्तीसाठी प्रत्यक्ष धोका कमीच असू शकतो. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही किंवा लगेच औषधोपचार सुरू करण्याची गरज नाही असे त्यांनी नमूद केले.

सतर्कता बाळगा
न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांच्या मते, तरुणांमध्ये रक्तदाबात होणारी अगदी थोडी वाढही दुर्लक्षित करता कामा नये. हा धोका आपण समजतो त्यापेक्षा लवकर सुरू होतो आणि पुरुष-स्त्रिया दोघांमध्येही समान असल्याने, इस्ट्रोजेनमुळे मिळणारा संरक्षणात्मक फायदा काही प्रमाणात कमी होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नियंत्रण मध्यम वयानंतर नव्हे, तर लवकर सुरू करणे गरजेचे आहे.

काय करावे?
नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि रक्तदाबाचे वेळोवेळी परीक्षण या गोष्टींवर त्यांनी विशेष भर दिला. या अभ्यासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली, ती म्हणजे तरुणांमध्ये डायस्टोलिक रक्तदाब आधी वाढण्याची शक्यता. मात्र, यामुळे लगेच औषधोपचार सुरू करावेत असा निष्कर्ष काढता येत नाही. फक्त डायस्टोलिक रक्तदाब वाढला म्हणून लगेच औषधोपचार सुरू करण्याची गरज असल्याचे ठोस पुरावे सध्या उपलब्ध नाहीत असे डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Gunratan Sadavarte LIVE : सदावर्ते जरांगेंना रोखणार? ‘चलो मुंबई’च्या घोषणेनंतर काय म्हणाले?
00:00
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53
Video thumbnail
Latur|MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चात रोहित पवार! ‘अध्यक्ष-सचिवांनी राजीनामा दिलाच पाहिजे’
01:58
Video thumbnail
MPSC STUDENT PROTEST|MPSC विद्यार्थ्यांचा लातुरात आक्रोश;पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर
03:44
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
10:07
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46

Latest news