पाथरीत धाडसी कारवाई; ८.७४ लाखांचा अवैध गुटखा आणि कार जप्त, आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

परभणी : परभणी जिल्ह्यात अवैध गुटख्याच्या तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पाथरी तालुक्यातून ८ लाख ७४ हजार ३५० रुपयांचा अवैध गुटखा आणि स्विफ्ट डिझायर कार जप्त केली आहे. पोलिसांनी सापळा रचून कार अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहनासह पळ काढला. मात्र पाठलागादरम्यान आरोपीने कार रस्त्याच्या कडेला सोडून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शनिवार (२५ जुलै) रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पाथरी तालुक्यात नियमित गस्त घालत होते. त्याचवेळी आष्टीकडून पाथरीच्या दिशेने एका स्विफ्ट डिझायर कारमधून मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने पाथरी-आष्टी मार्गावरील वडी पाटी परिसरात सापळा रचला.

काही वेळात संशयित कार त्या मार्गावर येताच पोलिसांनी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच चालकाने वाहनाचा वेग वाढवत घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ कारचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर रामपुरी-ढालेगाव मार्गावरील रामपुरी गावाजवळ आरोपीने कार रस्त्यावर सोडून दिली आणि अंधाराचा फायदा घेत शेताच्या दिशेने पसार झाला.

यानंतर पोलिसांनी वाहनाची कसून झडती घेतली असता कारमध्ये ‘राज निवास’ सुगंधित पान मसाला या नावाने विक्रीसाठी नेला जात असलेला मोठ्या प्रमाणातील अवैध गुटखा आढळून आला. कारवाईदरम्यान २ लाख ७४ हजार ३५० रुपयांचा अवैध गुटखा तसेच ६ लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ८ लाख ७४ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये तसेच संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या अवैध गुटख्याची वाहतूक नेमकी कुठून सुरू झाली होती, तो कोणाकडे पोहोचविण्यात येणार होता आणि या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. फरार झालेल्या दोन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सपोनि जायभाय, पीएसआय सवंडकर तसेच पोलीस अंमलदार विलास सातपुते, सचिन भदर्गे, सूर्यकांत फड, महेश पांगरकर, माणिक वाघ, विष्णू चव्हाण, मधुकर ढवळे, पुरी, हनवते आणि सय्यद यांनी संयुक्तपणे सहभाग घेतला. पुढील तपास पाथरी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असून अवैध गुटखा तस्करीविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news