भरतीवेळी मासिक पाळी आल्यास उमेदवारांना मिळणार मुदतवाढ

मुंबई : पोलिस भरतीसाठी मेहनत करणा-या तरुणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आली, तर तरुणींना पुढील तारीख किंवा काही दिवसांची मुदतवाढ दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांनी केली आहे. मासिक पाळीमुळे शारिरीक चाचणीदरम्यान अडथळा निर्माण होऊन तरुणींची वर्षभराची मेहनत वाया जाऊ नये, हा यामागचा उद्देश आहे. यासाठी राज्य सरकारने ५ ते ६ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिस भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेइतकीच, किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाची शारीरिक चाचणी असते. यामध्ये धावणे, गोळाफेक आणि लांब उडी यांसारख्या कसदार चाचण्यांचा समावेश होतो. अनेकदा असे घडते की, प्रचंड मेहनत करूनही केवळ शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यामुळे तरुणींना पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, अशक्तपणा किंवा चक्कर येणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक तरुणींना आपल्या क्षमतेनुसार कामगिरी करता येत नाही आणि त्यांची संधी हुकते. तरुणींची ही अडचण लक्षात घेऊन, आता जर एखाद्या उमेदवाराला शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळीचा त्रास होत असेल, तर तिला तत्काळ बाद न करता पुढील संधी दिली जाणार आहे.
आरोग्य तपासणी अनिवार्य
भरती प्रक्रियेदरम्यान एखाद्या तरुणीला मासिक पाळी आल्यास तिथे उपस्थित असलेल्या आरोग्य पथकाकडून तिची तपासणी करण्यात येईल. आरोग्य तपासणीनंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, तिला ५ ते ६ दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल. त्यानंतर तिची शारीरिक चाचणी घेतली जाईल. काही गंभीर प्रकरणांमध्ये जर उमेदवाराला अधिक मुदतीची गरज भासल्यास, त्याचाही विचार केला जाणार आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
– हा निर्णय महिला उमेदवारांसाठी मोठा दिलासा असला, तरी त्याची अंमलबजावणी करताना काही नियम व अटींचे पालन करणे आवश्यक असणार आहे. ही सुविधा नेमक्या कोणत्या भरती प्रक्रियेला लागू आहे (उदा. राज्यस्तरीय पोलिस भरती, एसआरपीएफ इ.), याबाबतची खात्री उमेदवारांनी करावी.

– आरोग्य तपासणी कोण करणार आणि मुदतवाढ मिळवण्यासाठी मैदानावर कोणती कागदपत्रे किंवा पुरावे सादर करावे लागतील, याची सविस्तर अधिकृत माहिती संबंधित भरती प्राधिकरणाकडून घेणे आवश्यक आहे.

– शारीरिक चाचणीची तारीख, आवश्यक कागदपत्रे आणि आरोग्य तपासणीसंबंधीचे नियम अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील, त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्यावी.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ

कोलकाता : बंगालच्या उपसागरामध्ये आणखी एक चक्रीवादळ निर्माण झाले...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Air Pollution issue|लातूरच्या पूर्व भागात वायुप्रदूषणाचा विळखा! टायर जाळल्याने विषारी धूर
02:24
Video thumbnail
Impact|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम! लातूरमध्ये फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीला सुरुवात
04:27
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये ग्रामसेवकाच्या घरात १५ लाखांची चोरी; गेट कापून चोरट्यांचा प्रवेश
02:35
Video thumbnail
DCM Sunetra Pawar|नांदेडमध्ये दुष्काळाचा आढावा; सुनेत्रा पवारांचे मोठे निर्देश
07:19
Video thumbnail
Latur News|प्रेम,विरह अन् स्त्रीच्या वेदना! 'पगला घोडा' नाटकाने प्रेक्षकांना केले अंतर्मुख
07:55
Video thumbnail
Purna|हाजी भाई कुरेशी यांचा वाढदिवस पूर्णा शहरात जल्लोषात
05:38
Video thumbnail
Nanded|कंधारमध्ये शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
01:17
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|धीरज देशमुखांचा पाच मुद्द्यांवर मोठा खुलासा!लातूर निवडणूक,सोनिया गांधी पुस्तक,जरांगे
07:14
Video thumbnail
Latur News|लातूरमध्ये १२ तासांचे भजन आंदोलन स्थगित! बी झोन कार्यालयात रात्री उशिरा बैठक
02:02
Video thumbnail
Latur City Bus|लातूरची सिटी बस सेवा बंद! १८ बसेस जाग्यावर, नागरिकांना आर्थिक भुर्दंड
03:36
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सफाई कामगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रीय सफाई आयोग आक्रमक
04:18
Video thumbnail
Latur News | सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या विटंबनेविरोधात काँग्रेसचे आंदोलन; मडकी फोडून निषेध
02:25
Video thumbnail
Himayatnagar News | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टची ११ लाखांची मदत
02:16
Video thumbnail
Nanded News | अशोक चव्हाणांसह चार आमदारांना धमकी देत खंडणीची मागणी; आरोपी मुंबईतून अटकेत
03:59
Video thumbnail
Latur Crime News | कोऱ्या बॉण्डपेपरवर सह्या घेऊन घर हडपल्याचा आरोप; महिला सावकाराविरोधात गुन्हा
02:16

Latest news