19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयमुख्यमंत्री गेहलोत निवडणुकीतून होणार बाद?

मुख्यमंत्री गेहलोत निवडणुकीतून होणार बाद?

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जोधपुरातील सरदारपुरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज संकेतस्थळावर अपलोड होताच खळबळ उडाली.

लगोलग गेहलोत यांनी त्यांच्या विरोधात दाखल असलेली दोन फौजदारी स्वरूपाची प्रकरणे दडविल्याची तक्रार भाजपचे खासदार गजेंद्र सिंह शेखावत यांनी मुख्य निवडणूक अधिका-यांकडे केली. आता गेहलोत यांचा उमेदवारी अर्ज रद्द ठरतो की काय, ते निवडणूक लढविण्यापासून वंचित होणार की काय, अशा स्वरूपाची चर्चा राज्यभरात सुरू आहे. गांधीनगर पोलिस ठाणे, दि. ८ सप्टेंबर २०१५. चंपादेवी चॅरिटेबल ट्रस्टला कोट्यवधींची जमीन लाखोंत विकल्याचे प्रकरण. २००३ मध्ये विद्याधर नगरातील ५४०० आणि ४०६५ चौ.मी. आकाराचे २ भूखंड ट्रस्टला देण्यात आले.

माजी मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निर्देशान्वये यूडीएच तत्कालीन सचिव एन. सी. गोयल यांनी आरक्षित दराऐवजी २५ टक्के सवलतीच्या दरात अवैधरीत्या ट्रस्टला दिल्याचे तपासातून समोर आले. जमिनीचे मूल्य २.५० कोटी असताना अवघ्या ६२ लाखांत गरीब मुलांना शिक्षण देण्याच्या नावाखाली देण्यात आल्याचेही स्पष्ट झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR