32.2 C
Latur
Tuesday, May 14, 2024
Homeराष्ट्रीयमुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक

मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली असून केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीचे (ईडी) पथक त्यांच्या निवासस्थानी सायंकाळी पोहोचले होते. दिल्लीचे मद्यविक्री धोरण लागू करताना आर्थिक गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याच आरोपांप्रकरणी केजरीवाल यांना ईडीने याआधी अनेकवेळा समन्स जारी केलेले आहे. मात्र यावेळी ईडीचे पथक थेट केजरीवाल यांच्या निवासस्थानी धडकले. त्यामुळे केजरीवाल यांना अटक होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता असे असताना केजरीवाल यांना रात्री ९ वाजता अटक करण्यात आली आहे.

दिल्ली मद्यविक्री धोरण घोटाळा प्रकरणी अटकेपासून सुरक्षा मिळावी यासाठी केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने केजरीवाल यांना अटकेपासून अंतरिम सुरक्षा देण्यास नकार दिला. यासह न्यायालयाने ईडीला केजरीवाल यांनी दाखल केलेल्या नव्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. तसेच या प्रकरणावर पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी होईल असे सांगितले. न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे केजरीवाल यांच्यासाठी चांगलाच धक्का असल्याचे मानले जात आहे. याच निकालानंतर आता ईडीचे पथक थेट केजरीवाल यांच्या निवासस्थानी धडकले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR