32.3 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रनांदेडमधून वसंत चव्हाण, लातूरमधून डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी

नांदेडमधून वसंत चव्हाण, लातूरमधून डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने तिसरी यादी आज जाहीर केलीे. काँग्रेसच्या या यादीत महाराष्ट्रातील ७ उमेदवारांचा समावेश आहे. यात कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, लातूर, पुणे, नंदुरबार आणि अमरावती या मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपनेही काही ठिकाणचे उमेदवार जाहीर केल्याने आता लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, नांदेडमध्ये आता भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध वसंत चव्हाण यांच्यात लढत रंगणार आहे. लातुरात कॉंग्रेसचे डॉ. शिवाजीराव काळगेविरुद्ध विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांच्यात लढत होणार आहे. सोलापुरातून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी भाजपचा उमेदवार अजून निश्चित व्हायचा आहे.

कॉंग्रेस पक्षाच्या निवडणूक समितीची बुधवारी नवी दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह समिती सदस्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीतच या उमेदवारांची यादी निश्चित झाली होती. मात्र, फक्त घोषणा बाकी होती. गुरुवारी रात्री ही यादी जारी करण्यात आली. या जाहीर केलेल्या ७ उमेदवारांपैकी ४ जणांचे मतदारसंघ हे आरक्षित आहेत. यात नंदूरबार,अमरावती, सोलापूर आणि लातूरचा समावेश आहे.

कोल्हापुरात कॉंग्रेसने छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर केली. तेथे भाजपचा उमेदवार मैदानात उतरणार की, विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळणार, हे अद्याप निश्चित नाही. पुण्यात कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पुण्यात रवींद्र धंगेकर विरुद्ध माजी महापौर तथा भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यात लढत रंगणार आहे. नंदूरबारमध्येही गोवाल पाडवी या नवीन चेह-याला उमेदवारी दिली आहे. येथे पाडवी यांची लढत विद्यमान भाजप खासदार हिना गावीत यांच्याशी लढत होईल. अमरावतीतही बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपने अद्याप येथे उमेदवार जाहीर केलेला नसला तरी विद्यमान खासदार नवनीत राणा यांनाच उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे वानखेडे विरुद्ध राणा अशी लढत रंगणार आहे.

महाराष्ट्रातील पहिली यादी
कोल्हापूर- शाहू महाराज
पुणे- रविंद्र धंगेकर
नंदुरबार- गोवाल पाडवी
सोलापूर- प्रणिती शिंदे
लातूर- शिवाजी कालगे
नांदेड- वसंत चव्हाण
अमरावती- बळवंत वानखेडे

एकूण ५७ जणांची यादी जारी
काँग्रेसने गुरुवारी ५७ जणांची तिसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील ७, गुजरातमधील ११, कर्नाटकमधील १७, राजस्थानमधील ६, तेलंगणामधील ५, पश्चिम बंगालमधील ८, आंध्र प्रदेशमधील २ तर पॉंडेचेरीमधील एका उमेदवाराचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR