नांदेड : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांना मराठी आली पाहिजे. यात राजकारण करण्यासारखे काय आहे, असे स्पष्ट मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नांदेड दौ-यात बोलताना केले.
उद्योग मंत्री उदय सामंत रविवारी सकाळी नांदेड जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. हदगाव येथे एका कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. सध्या ऑटोचालक व टॅक्सीचालकांना मराठी बोलता, वाचता आली पाहिजे. तरच पुढे त्यांना परवाने मिळतील असा फतवा सरकारच्या काढण्यात आला आहे. यावर सध्या वादविवाद सुरू आहेत.
यावर ते म्हणाले की मराठी महाराष्ट्रातील नागरिकांना येणे अत्यंत गरजेचे आहे. याचे विनाकारण कोणीही राजकारण करू नये, असे सांगत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या विरोधात कोणीही वक्तव्य करणे हे चुकीचे आहे. त्यांना शिवसेना कदापी माफ करणार नाही.
















