31.7 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeराष्ट्रीयतेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (एआयसीसी) प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यात तेलंगणासाठी सहा हमी आणि स्वतंत्र घोषणांचा समावेश आहे. ४२ पानी जाहीरनामा अभय हस्तम जारी केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, तेलंगणातील लोकांचा मूड आहे की, देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला सत्तेत आणायचे आहे. आम्ही कर्नाटकच्या जनतेला वचन दिले होते आणि ते पूर्णही केले, असे ते म्हणाले. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी तेलंगणा वेगळे राज्य करण्याबाबत काँग्रेस आणि सोनिया गांधी यांच्या भूमिकेचाही उल्लेख केला.

राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास महिलांना दरमहा २,५०० रुपये, ५०० ​रुपयात गॅस सिंिलडर, सर्व घरांना २०० युनिट मोफत वीज, रायथू भरोसा अंतर्गत शेतक-यांना दरवर्षी १५,००० रुपयांची मदत तर शेतमजुरांना १२,००० रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच उच्च शिक्षण घेणा-या प्रत्येक मुलीला मोफत स्कूटी देण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यातही चेयुथाद्दल बोलले गेले आहे. चेयुथा अंतर्गत, पात्र लाभार्थ्यांना ४,००० रुपये पेन्शन आणि १० लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण दिले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधत काँग्रेस प्रमुख म्हणाले की, आज मी आव्हान देऊ शकतो आणि म्हणू शकतो की मोदी आणि केसीआर यांनी मिळून कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेसच सत्तेवर येईल. राव यांची खिल्ली उडवत ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणतात की ते निवृत्त होण्यास तयार आहेत आणि लोकही त्यांना निरोप द्यायला तयार आहेत.

जाहीरनाम्यातील काही स्वतंत्र घोषणा
शेतक-यांचे एक लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ होणार आहे. शेतक-यांना २० लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज दिले जाईल. शेतक-यांना २४ तास विना कपात वीज दिली जाईल. सर्व प्रमुख पिकांसाठी सर्वसमावेशक पीक विमा योजना दिली जाईल. सर्व प्रमुख पिकांसाठी सर्वसमावेशक पीक विमा योजना दिली जाईल. मुख्यमंत्री शिबिर कार्यालयात दररोज ‘‘प्रजा दरबार’’ आयोजित केला जाईल. शिक्षकांची सर्व रिक्त पदे मेगा डीएससी द्वारे ६ महिन्यांत भरली जातील.

मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अंमलबजावणी
खर्गे म्हणाले की, आम्ही तेलंगणाला दिलेल्या सर्व सहा हमींची अंमलबजावणी करू. जाहिरनामा आमच्यासाठी गीता, कुराणकिंवा बायबलसारखा आहे. सर्व सहा हमी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अंमलबजावणीसाठी मंजूर करण्यात येतील, असे खर्गे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR