नवी दिल्ली : परदेशी देणगी नियमन कायद्यातील (एफसीआरए) प्रस्तावित दुरुस्ती विधेयकाला काँग्रेस ठामपणे विरोध करणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. या विधेयकाच्या विरोधातील पुढील रणनीती सोमवारी विरोधी पक्षांच्या सभागृह नेत्यांच्या बैठकीत निश्चित केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
खरगे यांनी एएनआयशी संवाद साधताना त्यांनी एफसीआरए दुरुस्ती विधेयकावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात हे विधेयक लोकसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. एफसीआरएशी संबंधित या निर्णयाला आम्ही विरोध करू. उद्या विरोधी पक्षांच्या सभागृह नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर पुढील रणनीतीबाबत निर्णय घेतला जाईल असे खरगे यांनी सांगितले.
एफसीआरए दुरुस्ती विधेयकाला अनेक विरोधी पक्षांनी विरोध दर्शवला आहे. काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी काँग्रेस या विधेयकाला तीव्र विरोध करणार असल्याचे सांगितले. सरकार अशा प्रकारचे विधेयक जबरदस्तीने मंजूर करू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला. प्रस्तावित विधेयकाद्वारे ऋङ्म१ी्रॅल्ल उङ्मल्ल३१्रु४३्रङ्मल्ल (फीॅ४’ं३्रङ्मल्ल) अू३, 2010 मध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. परदेशातून मिळणा-या आर्थिक मदतीचे नियमन अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी करण्याचा उद्देश असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे.
















