28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडादक्षिण आफ्रिका ४ बाद ३५७

दक्षिण आफ्रिका ४ बाद ३५७

 डी कॉकचे चौथे तर दुसेनचे दुसरे शतक

पुणे : द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझिलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉक आणि वॅन डेर दुसेन यांची शतकी खेळी आणि अंतिम षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत डेव्हिड मिलरने अर्धशतकी खेळी केली. याच्या जोरावर द. आफ्रिकेने सामन्यात ४ बाद ३५७ धावांपर्यंत मजल मारली. न्यूझिलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक २ विकेट घेतल्या.

सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना आफ्रिकेचा कर्णधार बवुमा २४ धावा करून बाद झाला. यानंतर सलामीवीर डी कॉक आणि दुसेनने द्विशतकी भागीदारी केली.
दुसेनने ११८ चेंडूत १३३ धावा केल्या. डी कॉकने ११६ चेंडूत ११४ धावांची खेळी खेळली. दुसेनने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि पाच षटकार मारले. तर डी कॉकने १० चौकार आणि तीन षटकार ठोकले.

डेव्हिड मिलरने ३० चेंडूत ५३ धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि चार षटकार मारले. डी कॉक आणि वॅन डेर दुसेनने दुस-या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी केली. क्लॅसेन सात चेंडूत १५ धावा करून नाबाद राहिला आणि एडन मार्करम एका चेंडूवर सहा धावा करून नाबाद राहिला. न्यूझिलंडकडून टीम साऊदीने दोन विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्ट आणि जेम्स नीशम यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
न्यूझिलंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीराने यंदाच्या वर्ल्डकपमधील चौथे शतक झळकावले.

वर्ल्ड कपच्या एका पर्वात ४ किंवा त्याहून अधिक शतके झळकावणा-या फलंदाजांमध्ये क्विंटनचा समावेश झाला आहे. रोहित शर्माने २०१९मध्ये ५ शतकं झळकावली होती, तर कुमार संगकाराने २०१५ मध्ये ४ शतकं केलेली. आफ्रिकेकडूनकिं्वटनचे हे वन डेतील २१वे शतक ठरले आणि त्याने हर्षल गिब्सची बरोबरी केली.

त्याने आणि वॅन डेर दुसेन यांनी दोनशे धावांची भागीदारी केली. वॅन डेर दुसेननेही शतक झळकावले. त्याने शेवटच्या षटकात डेव्हिड मिलरसह अक्षरश: वादळ आणले होते. आफ्रिकेने आणखी एकदा तीनशे पार करत ३५७ धावांचा डोंगर उभा केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR