23.5 C
Latur
Sunday, October 13, 2024
Homeराष्ट्रीयमुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी

मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी

२० कोटींची मागणी, आमच्याकडे भारतात सर्वोत्तम नेमबाज

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याच्या धमकी आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने ईमेलद्वारे सांगितले आहे की, जर त्यांनी २० कोटी रुपये दिले नाहीत तर ते मुकेश अंबानींना मारून टाकतील. आमच्याकडे भारतात सर्वोत्तम नेमबाज आहेत, असे ईमेलमध्ये म्हटले आहे. ही धमकी २७ ऑक्टोबर रोजी शादाब खान नावाच्या व्यक्तीने पाठवली होती.

वृत्तसंस्थेनुसार, मुंबई पोलिसांनी गावदेवी पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम ३८७ आणि ५०६ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी मुंबई पोलिसांनी बिहारमधील एका व्यक्तीला अटक केली होती ज्याने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी दिली होती. त्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांचे घर आणि रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी दिली होती. यापूर्वी २०२१ मध्ये अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही सापडली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR