धनंजय मुंडे म्हणजे शेखचिल्ली

छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी गुरूवारी पुन्हा एकदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. धनंजय मुंडे हे शेखचिल्ली आहेत. ते ज्या फांदीवर बसतात, तीच फांदी तोडतात.

मनोज जरांगे यांनी गुरूवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी त्यांच्या घातपाताचा कथित कट रचल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, मी लपत नाही. मला लपता पण येत नाही. राजकारणाचा मला नादच नाही. पण समाजाच्या जिवावर उठल्यानंतर मी दम खात नाही. तुम्ही तुमचे राजकारण करा. मोठे व्हा. मराठ्यांवर अन्याय का करता? तुम्ही अन्याय केला. मग मी सोडणार नाही. तुम्ही कितीही जहागीरदार असला तरी मी सोडणार नाही.

मला आत्ताच्या प्रकरणातही राजकारण आणायचे नाही. माझ्या घातपाताच्या प्रकरणात मी नार्को टेस्टची मागणी केली नाही. त्या (धनंजय मुंडे) माणसाने केली. आता लपायचे नाही. चला नार्को टेस्टला. जातवान वागायचे. त्यांनी टेस्टची तयारी दर्शवल्यानंतर मी दुस-याच दिवशी अर्ज केला. माझा अर्ज चुकीचा असेल, तर तुम्ही कसाही लिहून आणा. कोर्टात चला, हायकोर्टात चला, राज्यपालांकडे चला, राष्ट्रपतींकडे चला, कुठेही चला. तिथे सह्या केल्या नाही तर दोन बापाची अवलाद. मी शेतक-याचा मुलगा आहे. आम्हाला खोटे चालत नाही.

घातपाताचा कट स्वत: धनंजय मुंडेंनी रचला
मनोज जरांगे म्हणाले, राजकारण सुरूच असते. पाडापाडीही सुरू असते. एकमेकांवर टीका करणेही सुरू असते. पण तुम्ही माझ्या घातपातापर्यंत गेलात. आता तुम्हाला सुट्टी नाही. चल, लपू नको. एका बापाचे असल्यासारखे नार्कोटेस्टला निघायचे. प्रस्तुत प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कांचन साळवी नामक तरुणाची मला ओळखही नाही. त्यांनी त्याला त्याच्या घरी येऊन परळीला नेले. त्याने सांगितले की, आम्ही परळीच्या बैठकीला गेलो होतो. याचा अर्थ खुनाचा कट परळीत शिजला. हा कट स्वत: धनंजय मुंडे यांनी रचला. हे दोन-चार आरोपींनी मिळून रेस्ट हाऊसमध्ये बसून हा कट शिजवला. हेच सत्य आहे. ते समोर येईल. आता फक्त अजित पवारांनी सांभाळून राहावे. त्यांनी खोडा घालू नये. विनाकारण त्यांना बळ देण्याचे काम करू नये. अन्यथा मोठा घोळ होईल. प्रत्येक वेळेस वाचवायचे नाही. तुमची व माझी नार्टो टेस्टची तयारी आहे. मग प्रॉब्लेम काय? मी नार्कोटेस्ट करतो. त्याहून अधिक मोठी चाचणी असेल तर त्यालाही सामोरे जाण्याची माझी तयारी आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news