लालपरीची दिवाळी….१६ दिवसांत ५४८ कोटींची विक्रमी कमाई

मुंबई : प्रतिनिधी
दिवाळीचा सण आणि सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर गावाकडे जाण्यासह परतीच्या प्रवासासाठीही प्रवाशांनी एसटीला मोठी पसंती दिली. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या १६ दिवसांत एसटीने तब्बल ५४८ कोटी २२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. विशेष म्हणजे, १६ नोव्हेंबरला एकाच दिवसात परतीच्या प्रवाशांमुळे ४६ कोटी ५३ लाख रुपयांची विक्रमी कमाई करून महामंडळाने नवा उच्चांक नोंदवला.

ऑक्टोबर महिन्यात महिला सन्मान योजनेच्या अंमलबजावणीतील निर्बंध आणि दुष्काळी परिस्थितीचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाला होता. मात्र, नोव्हेंबरमध्ये दिवाळीचा हंगाम, सलग सुट्या आणि प्रवाशांच्या वाढलेल्या संख्येमुळे एसटीच्या उत्पन्नाला मोठी झळाळी मिळाली. महिला सन्मान योजनेच्या अंमलबजावणीत देण्यात आलेल्या शिथिलतेचाही यामध्ये हातभार लागला. पहिल्या १६ दिवसांत एसटीने दररोज सरासरी ३४ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली. यंदाच्या दिवाळीत प्रवाशांना दिलासा देण्यासाठी गर्दीच्या हंगामात आकारली जाणारी हंगामी भाडेवाढ महामंडळाने रद्द केली होती. त्यामुळे सणासुदीच्या काळातही प्रवाशांना नियमित तिकीट दरात प्रवास करता आला. सुरक्षितता, विश्वासार्हता आणि परवडणारे भाडे यामुळे खासगी वाहतुकीऐवजी प्रवाशांनी लालपरीला पसंती दिल्याचे या उत्पन्नातून स्पष्ट झाले आहे.

एसटीच्या या विक्रमी कामगिरीबद्दल परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांचे आभार मानले. तसेच दिवाळीच्या गर्दीच्या काळात सुरक्षित आणि सुरळीत सेवा देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे एसटीचे अधिकारी, कर्मचारी, चालक आणि वाहक यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. प्रवाशांचा विश्वास आणि कर्मचा-यांच्या मेहनतीमुळेच एसटीला हा विक्रमी टप्पा गाठता आला, असे त्यांनी नमूद केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded News| माहूरच्या दत्त मांजरीत २०० हून अधिक गांजाची झाडे जप्त;एक कोटीहून अधिक किमतीचा मुद्देमाल
01:50
Video thumbnail
Nanded News | माहूरमध्ये ८३ किलो गांजा जप्त; ४१.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, ११८ झाडे उद्ध्वस्त
02:27
Video thumbnail
Latur News |आमदार अमित देशमुखांच्या हस्ते किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे उद्घाटन
09:08
Video thumbnail
Latur News | पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर मनपाची कारवाई; २५ जणांना दंड, २६७ जणांना नोटिसा
02:05
Video thumbnail
Nanded News | रोहित पवारांवर गुन्हा दाखल करा; भाजपाची पोलिसांकडे मागणी, महापौरांचे निवेदन
02:37
Video thumbnail
Latur News | समान काम समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; न्यायालयीन कामकाज ठप्प
05:22
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42

Latest news