Homeपरभणीदामिनी राष्ट्रीय पुरस्काराने डॉ. संजीवनी मगर सन्मानित

दामिनी राष्ट्रीय पुरस्काराने डॉ. संजीवनी मगर सन्मानित

परभणी : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त नाशिक येथे आयोजित सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल जिल्ह्यातील पहिल्या महिला नवजात शिशूतज्ञ डॉ.संजीवनी मगर यांना दामिनी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.महेंद्र देशपांडे, डॉ.अमित केले, उपमहापौर विलास शिंदे, शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आशा पाटील, मिस इंडिया अश्विनी अत्रे (दुबई) यांची प्रमुख उपस्थिती होती. २३ वर्षापूर्वी डॉ. मगर यांनी अनेक स्त्री नवजात शिशूचे मोफत तसेच अल्पदरात उपचार केलेले आहेत.

आशा शिशूगृह परभणी येथे मानद डॉक्टर म्हणून काम करताना शेकडो निराधार, जन्मत:च टाकून दिलेल्या शिशूवर उपचार करून त्यांना योग्य कुटुंबात दत्तक देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. या योगदानाबद्दल डॉ.मगर यांनी सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR