Homeअंतरराष्ट्रीयआधी भारत बघा, मग बोला!" अशा शब्दांत इराणी कोन्सलेटने ट्रम्प यांना सुनावले असून त्यांना...

आधी भारत बघा, मग बोला!” अशा शब्दांत इराणी कोन्सलेटने ट्रम्प यांना सुनावले असून त्यांना ‘कल्चरल डिटॉक्स’ करण्याचा दिला सल्ला

मुंबई : डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर मायकेल सॅव्हेज यांच्या एका पॉडकास्टचा उतारा शेअर केला होता. या पॉडकास्टमध्ये अमेरिकेतील जन्मजात नागरिकत्वाच्या (Birthright Citizenship) कायद्यावर टीका करताना भारत आणि चीनसारख्या देशांचा उल्लेख “Hellhole” (नरक किंवा अतिशय घाणेरडी जागा) असा करण्यात आला होता. ट्रम्प यांनी हे विधान रिट्विट/शेअर केल्याने भारतामध्ये संतापाची लाट उसळली.

इराणी कोन्सलेटचे सडेतोड उत्तर
या वादात आता इराणने उडी घेतली असून ट्रम्प यांच्या मानसिकतेवर प्रहार केला आहे. हैदराबाद येथील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले की, भारत आणि चीन हे जागतिक संस्कृतीचे पाळणे (Cradles of Civilization) आहेत. ज्यांना या महान संस्कृतींची किंमत नाही, त्यांनी आधी भारत प्रत्यक्ष येऊन पहावा आणि मगच भाष्य करावे. ट्रम्प यांना सध्या ‘कल्चरल डिटॉक्स’ची नितांत गरज आहे.इराणी कोन्सलेटने पुढे असेही म्हटले की, ज्या राष्ट्राध्यक्षाने “संपूर्ण संस्कृती नष्ट करण्याची” धमकी दिली होती , त्यांच्याकडून अशा प्रकारच्या हीन विधानांची अपेक्षा करणे आश्चर्यकारक नाही. खऱ्या अर्थाने ‘नरक’ तिथेच आहे जिथे युद्धखोर वृत्ती जोपासली जाते.

भारताची अधिकृत प्रतिक्रिया
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) ट्रम्प यांचे हे विधान “माहितीचा अभाव असलेले आणि अयोग्य” असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी स्पष्ट केले की, ही विधाने भारत-अमेरिका यांच्यातील दृढ संबंधांचे प्रतिबिंब नाहीत.

अमेरिका आणि इराण यांच्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी इराणला “एक संपूर्ण संस्कृती नष्ट करण्याची” धमकी दिली होती, ज्याचा संदर्भ इराणी दूतावासाने आपल्या उत्तरात दिला आहे. अमेरिकेतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प स्थलांतरित आणि अन्य देशांविरुद्ध आक्रमक भाषा वापरत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

इराणी दूतावासाच्या या भूमिकेमुळे आता हा वाद केवळ भारत-अमेरिका राहिला नसून, त्याला ‘संस्कृती विरुद्ध अहंकार’ असे स्वरूप प्राप्त झाले आहे. ट्रम्प यांच्या या विधानामुळे जगभरातील भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR