16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रकोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का

कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का

सातारा : कोयना धरण परिसरात अधूनमधून भूकंपाचे धक्के बसत असतात. आता पुन्हा शनिवारी कोयना धरण परिसरात भूकंप जाणवला. सातारा कोयना नगर परिसरात रात्री ९.०६ मिनिटांनी भूकंपाची नोंद करण्यात आली. २.९ रिश्टर स्केलचा हा भूकंपाचा धक्का असल्याची नोंद करण्यात आली.

या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठेही नुकसान झाले नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना विभागात गोषटवाडी गावच्या पश्चिमेला ७ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची जमिनीतील खोली सात किलोमीटर असल्याची नोंद कोयना भूकंप मापन केंद्रावर झाली आहे. या भूकंपाचा कोणताही परिणाम कोयना धरणावर झाला नसल्याचे अधिका-यांनी स्पष्ट केले.
कोयना धरण सुरक्षित

भूकंपाच्या धक्क्यानंतर कोयना धरण सुरक्षित असल्याची माहिती कोयना धरणावर असलेल्या सिंचन विभागाच्या अधिका-यांनी दिली. भूकंपाच्या या धक्क्यामुळे परिसरात कुठेही कोणतीही हानी झाली नाही. तसेच कोठेही पडझड झाली नाही. भूकंपाचा हा धक्का सौम्य होता. तो कोयनानगर परिसरातच जाणवल्याचे अधिका-यांनी सांगितले. कोयना धरण परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात. या भूकंपांच्या धक्क्यांची रिश्टर स्केलवर तीव्रता कमी आहे. यामुळे कोयना धरणाला कोणतीही हानी पोहोचली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR