21.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रउद्योजक सुरेश कुटे भाजपात प्रवेश करणार?

उद्योजक सुरेश कुटे भाजपात प्रवेश करणार?

अमित शहांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाची शक्यता

बीड : उद्योग क्षेत्रातून कुटे यांनी जगभरामध्ये बीड जिल्ह्याचा नावलौकिक केला. आता कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दिवाळीनंतर सुरेश कुटे यांचा भाजपमध्ये अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश होणार आहे. दिल्लीत हा प्रवेश होणार आहे. त्यांच्या प्रवेशामुळे आगामी काळात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांत भाजपचे बळ आणखी वाढणार आहे.

कुटे उद्योग समूहाने अल्पावधीमध्ये मोठी झेप उद्योग क्षेत्रात घेतलेली आहे. तिरुमला हा तेलाच्या क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँड कुटे उद्योग समूहाने तयार केलेला आहे. कापड दुकान ते १९ कंपन्यांचा १७ हजार कोटी रुपयांचे अ‍ॅसेट असलेला ‘द कुटे ग्रुप’चे चेअरमन सुरेश कुटे महाराष्ट्रातील मोठ्या उद्योजकांमध्ये समाविष्ट असलेले मोठे नाव. तसं पाहायला गेलं तर सुरेश कुटे राजकारणापासून लांबच राहणं पसंत करत होते. पण अचानक त्यांनी घेतलेल्या भाजप प्रवेशाच्या निर्णयामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात चर्चांना उधाण आले आहे.

‘द कुटे ग्रुप’मुळे जिल्ह्याचाही लौकिक झाला, तसेच हजारो बेरोजगारांना नोक-या मिळाल्या आहेत. महिलांसाठी त्यांनी पत्नी आणि समूहाच्या व्यवस्थापकीय संचालिका अर्चना कुटे यांच्या पुढाकाराने त्यांच्या समूहात खास नोक-यांची संधी निर्माण करून दिली आहे. दिवाळीनंतर सुरेश कुटे यांचा भाजपमध्ये अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश होणार आहे. दिल्लीत त्यांचा हा पक्ष प्रवेश होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR