37.7 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeराष्ट्रीयपन्नू प्रकरणातील अमेरिकन मीडियाच्या रिपोर्टवर परराष्ट्र मंत्रालय संतप्त

पन्नू प्रकरणातील अमेरिकन मीडियाच्या रिपोर्टवर परराष्ट्र मंत्रालय संतप्त

नवी दिल्ली : भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीय गुप्तचर एजन्सी रॉचा एक अधिकारी सहभागी असल्याचा दावा करणा-या अमेरिकन मीडियाचे वृत्त फेटाळून लावले आहे.

अमेरिकन मीडियाने अज्ञात सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या एका अहवालामध्ये रॉ अधिका-याच्या नावाचा उल्लेक केला आहे. पन्नूच्या हत्येच्या कटात याच अधिका-याचा हात असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

दरम्यान, मंगळवारी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हे वृत्त निराधार असल्याचे सांगत फेटाळले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, या अहवालात गंभीर प्रकरणावर निराधार आणि अन्यायकारक आरोप करण्यात आले आहेत. संघटित गुन्हेगारी, दहशतवाद आणि इतरांबाबत अमेरिकन सरकारने सामायिक केलेल्या सुरक्षेच्या चिंतांची भारत सरकारकडून उच्च पातळीवर तपासणी केली जात आहे. बेजबाबदार आणि काल्पनिक टिप्पणी करून काहीही फायदा होणार नाही, असेही जैस्वाल म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR