पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेडात तलवारीने हल्ला

नांदेड : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंह बादल यांच्यावर गुरुवारी नांदेड येथील प्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा परिसरात एका अज्ञात इसमाने तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या अचानक झालेल्या हल्ल्यात बादल यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून, त्यांना तातडीने उपचारासाठी शहरातील यशोसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गुरुद्वारा परिसर आणि संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सुखबीरसिंह बादल हे आपली पत्नी तथा खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासह बुधवारी धार्मिक दर्शनासाठी नांदेडमध्ये दाखल झाले होते. गुरुवारी सकाळी गुरुद्वारा परिसरात दर्शन घेत असताना निहंग पोशाखात आलेल्या एका इसमाने त्यांच्यावर शस्त्राने (तलवारीने) अचानक वार केला. सुरक्षा रक्षक आणि उपस्थितांनी तत्परता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र यात बादल यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली.

पोलिस बंदोबस्तात वाढ, एकाला ठोकल्या मुसक्या
​घटनेची माहिती मिळताच नांदेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. हल्ला करणा-या संशयित आरोपीला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आहे. हल्ल्याचे नेमके कारण काय? आरोपीचा बादल यांच्याशी काही जुना विवाद होता का? अथवा यामागे काही राजकीय/धार्मिक षड्यंत्र आहे का, याचा कसून तपास पोलिस करत आहेत.

परिस्थिती नियंत्रणात
घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सचखंड गुरुद्वारा परिसर आणि यशोसाई हॉस्पिटलच्या बाहेर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या परिसरातील वातावरण शांत मात्र तणावपूर्ण असून नागरिकांनी आणि भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, यशोसाई हॉस्पिटलमध्ये सुखबीरसिंह बादल यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत लवकरच रुग्णालयाकडून अधिकृत वैद्यकीय बुलेटिन जारी केले जाण्याची शक्यता आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अजय देहाडे यांच्या भीमगीतांची मेजवानी! भीमसैनिकांचा उत्साह शिगेला
08:44
Video thumbnail
Latur|लातूरच्या आंबेडकर पार्कवर खासगी वाहनांचे अतिक्रमण? भीमसैनिक आक्रमक; आंदोलनाचा इशारा
01:50
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख बिनविरोध
02:46
Video thumbnail
Latur District Bank Election 2026|धीरज देशमुख यांची लातूर जिल्हा बँकेत बिनविरोध निवड
01:31
Video thumbnail
Latur Crime News|शेकडो नागरिकांसमोर युवकावर कोयत्याने वार; औसा शहरात खळबळ
00:54
Video thumbnail
Nanded|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दसरा उत्सव | हल्ला मोहल्ला आणि भव्य नगरकीर्तन
04:43
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते ‘मिरा सारीज’चे थाटात उद्घाटन
03:33
Video thumbnail
Vijayadashami 2026|बाभळगावात धीरज देशमुख, श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते पारंपरिक अश्वपूजन
01:41
Video thumbnail
लातूरच्या बाभळगावातील दसरा मेळावा LIVE
44:57
Video thumbnail
Latur|लातुरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात | संजय बनसोडे यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण
02:22
Video thumbnail
Nanded|माहूरगडावर व्हीआयपी दर्शनामुळे वाहतूक कोंडी? संतप्त भाविकाने आमदाराच्या गाडीची काच फोडली
01:39
Video thumbnail
Latur|जळकोट पोस्ट ऑफिसमध्ये दिव्यांगांची हेळसांड; प्रशस्त जागेत स्थलांतर करण्याची मागणी
01:29
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये जुने शेतकरी भवन जमीनदोस्त | दीड कोटींच्या नवीन भवनाचे काम सुरू होणार
02:04
Video thumbnail
Nanded|नांदेडच्या बोरगावातील ४६ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
03:38
Video thumbnail
Latur|लातूर महापालिकेचा मोठा निर्णय! कर भरला नाही तर थेट मालमत्तेचा लिलाव!
01:40

Latest news