32.5 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeराष्ट्रीयसौदीच्या प्रिन्ससोबत बोलून हजचा कोटा वाढवला : मोदी

सौदीच्या प्रिन्ससोबत बोलून हजचा कोटा वाढवला : मोदी

अलीगड : पूर्वी हजचा कोटा कमी असल्याने किती मारामार व्हायची, त्यातही लाचखोरी होत होती. केवळ श्रीमंत लोकांनाच हजला जाण्याची संधी मिळायची. मात्र आता हज कोटा वाढवण्याबरोबरच व्हिसाचे नियमही सोपे करण्यात आले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी म्हटले आहे. ते सोमवारी अलीगडमध्ये हाथरस आणि अलीगड लोकसभेच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ एका प्रचारसभेत बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

ते म्हणाले काँग्रेस आणि सपासारख्या पक्षांनी नेहमीच तुष्टीकरणाचे राजकारण केले. मुस्लिमांच्या उन्नतीसाठी काही केले नाही. मी जेव्हा पसमंदा मुस्लिमांच्या दुरवस्थेसंदर्भात बोलतो, तेव्हा त्यांना टेन्शन येते. मोदी म्हणाले पूर्वी हज कोटा कमी असल्याने त्यात लाचखोरी चालायची. केवळ श्रीमंत लोकांनाच हजला जाता येत होते. मी सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्सला विनंती केली होती की, भारतातील आमच्या मुस्लिम बांधवांसाठी हज कोटा वाढविण्यात यावा. आज, भारताचा हज कोटा तर वाढलाच, शिवाय, व्हिसा नियमही सोपे केले आहेत. सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. पूर्वी मुस्लीम माता-भगिनी एकट्याने हजला जाता येत नव्हते. आता सरकारने मेहरमाशिवाय हजला जाण्याची परवानगी दिली आहे. आज अशा हजारो भगिनी मला आशीर्वाद देत आहेत, ज्यांचे हजला जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

अलीगडमधील कर्फ्यूवर फुल स्टाप
नरेंद्र मोदी म्हणाले, पूर्वी फुटीरतावादी कलम ३७० च्या नावाने अभिमानाने राहत होते. आमच्या सैनिकांवर दगडफेक करत होते. मात्र आता, भाजप सरकारच्या काळात याला पूर्णविराम मिळाला आहे. अलिगडमध्ये पूर्वी रोज कर्फ्यू असायचा, आता ते संपले आहे. हे योगी सरकारने आपल्याला करून दिले आहे. दंगली, हत्या, गँगवॉर, खंडणी हे सर्व सपा सरकारचा ट्रेडमार्क होता. हीच त्यांची ओळख होती, यावरच त्यांचे राजकारण चालत होते. मात्र, योगीजींच्या सरकारमध्ये, नागरिकांची शांतत बिघडवण्याची गुन्हेगारांची हिंमत नाही असेही मोदी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR