परभणीत उपोषणकर्त्या २ महिलांची प्रकृती खालावली

परभणी : परभणीतील अंगणवाड्यांना गरम व ताजा आहार पुरवठा करण्यासाठी ई-निविदा (ई-टेंडर) प्रक्रिया तातडीने राबविण्याच्या मागणीसाठी महिला बचत गट, महिला मंडळ व स्वयंसेवी संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. ८ जुलै पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाची प्रशासनाने दखल न घेतल्याने रविवार, दि. १२ जुलै रोजी पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच होते. दरम्यान, सलग उपोषणामुळे उपोषणकर्त्या कल्पना दळवी, शेख मुमताज या २ महिलांची प्रकृती खालावली असून उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फौजिया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था परभणीच्या अध्यक्ष शेख मुमताज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. या संदर्भात दि. २५ जून २०२६ रोजी जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन अंगणवाड्यांना आहार पुरवठा करण्यासाठी ई-निविदा काढण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने महिला बचत गटांनी दि. ८ जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणात कल्पना दळवी, शेख मुमताज, मीना चव्हाण, उषा पंचांगे, उषा बिडवे, तसलीम पठाण यांचा सहभाग आहे. उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की, शासनाच्या नियमानुसार अंगणवाड्यांना गरम व ताजा आहार पुरवठ्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नसल्याने महिला बचत गटांवर अन्याय होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

दरम्यान उपोषणाच्या पाचव्या दिवशी कल्पना दळवी व शेख मुमताज या दोन महिलांची प्रकृती बिघडल्याने आंदोलनस्थळी काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर संबंधित महिलांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने तात्काळ ई-निविदा प्रक्रिया सुरू करून महिला बचत गटांना न्याय द्यावा. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी परभणी यांनाही देण्यात आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59

Latest news