नवी दिल्ली : लोकसभेच्या तोंडावर तेलंगणाचा अपवाद वगळता हिंदी भाषिक राज्यात काँग्रेसची धुळदाण झाल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडीमधील घटक पक्षांशी तातडीने फोनाफोनी सुरू केली. तेलंगणा सोडून छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. मध्य प्रदेशातही दारुण पराभव झाला. त्यामुळे आता थेट लोकसभेलाच सामना होणार असल्याने इंडिया आघाडीची जुळवाजुळव सुरु झाली असून, दि. ६ डिसेंबर रोजी राजधानी दिल्लीत बैठक होणार आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी आज ६ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत इंडिया आघाडीमधील पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीचे स्मरण खरगे यांनी करून दिले. मल्लिकार्जुन खरगे यांनी द्रमुक आणि तृणमूल काँग्रेससह आघाडीमधील पक्षांना बैठकीची माहिती दिली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काही दिवसांनी ही बैठक होणार आहे. त्यामुळे पुढील बैठक महत्त्वाची आहे. पाच राज्यातील निकाल पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकीची महत्त्वपूर्ण इशारा आहे. त्यामुळे या बैठकीत यासंबंधी मंथन होणार आहे.
या अगोदर इंडिया आघाडीची बैठक उद्धव ठाकरे यांनी आयोजित केली होती. त्यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पाच राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. दोन दिवसांच्या चर्चेमध्ये युतीने आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रमुख निवडणूक मुद्यांवर चर्चा केली, समन्वय समिती तयार केली आणि २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुका शक्य असेपर्यंत एकत्र लढण्यासाठी तीन-सूत्री ठराव मंजूर केला होता.