भारताचा जीडीपी वाढणार

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादला आहे. अमेरिकेच्या या धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता होती. मात्र या कराचा कोणताही परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झालेला नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने(आयएमएफ) २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी भारताचा जीडीपी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आयएमएफने जीडीपी ०.२ टक्क्यांनी वाढून तो ६.६ % असेल असे म्हटले आहे. आयएमएफच्या अंदाजामुळे अमेरिकेचा डाव फसला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार भारताचा जीडीपी एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने म्हणजे ७.८ % वाढला. देशांतर्गत व्यापार मजबूत झाल्याने हा वेग जास्त राहिला. यामुळे अमेरिकेने भारतावर ५० टक्के कर लादला तरी भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था होती. याचाच अर्थ अमेरिकेच्या निर्णयाचा कोणताही परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला नाही. उलट भारताचा विकासदर वाढला आहे.

आयएमएफने काय म्हटले?
आयएमएफने आपल्या अहवालात म्हटले की. २०२५-२६ साठी भारताचा विकास दर पहिल्या तिमाहीत वेगाने वाढला. त्यामुळे अमेरिकेने लादलेल्या शुल्कामुळे होणारे भरून निघाले आहे. यंदाच्या वर्षी भारताचा विकासदर ६.४ वरून वाढवून ६.६ टक्के करण्यात आला आहे. मात्र पुढील आर्थिक वर्षासाठी भारताचा विकासदर कमी होईल असे आयएमएफने म्हटले आहे. २०२६-२७ साठी भारताचा विकासदर अंदाजे ०.२ टक्क्यांनी कमी होऊन तो ६.२% असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचात अर्थ भारताच्या विकासदरात घट होणार आहे.

जागतिक बँकेचाही सकारात्मक अंदाज
जागतिक बँकेने गेल्या आठवड्यात २०२५-२६ साठी भारताचा विकासदर ६.३% वरून ६.५% पर्यंत वाढवला होता. तसेत पुढील आर्थिक वर्षात विकासदर ६.५ % वरून ६.३% पर्यंत कमी केला होता. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही चालू वर्षांच्या अंदाजात वाढ केली आहे, ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला आहे. अमेरिकेने भारतावर कर लादून अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता जागतिक बँक आणि आयएमएफच्या अंदाजांमुळे अमेरिकेचा निर्णय फसल्याचे समोर आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
00:00
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news