23.4 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeराष्ट्रीयएल्विश यादवची चौकशी सुरू

एल्विश यादवची चौकशी सुरू

नोएडा : बिग बॉस विजेता एल्विश यादव रेव्ह पार्टी प्रकरणी अडचणीत सापडला आहे. नोएडा पोलिसांनी रात्री उशिरा एल्विश यादवची चौकशी केली. पोलिसांनी एल्विश यादवला पोलिस ठाण्यात बसवून जवळपास ३ तास चौकशी केली आणि यादरम्यान एल्विशला अनेक प्रश्न विचारले.

नोएडामध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन आणि विदेशी मुलींना आमंत्रित करणे आणि विषारी सापांचे विष नशेसाठी वापरल्याबद्दल एल्विश यादव आणि काही अज्ञात लोकांसह सहा नावांच्या लोकांविरुद्ध सेक्टर-४९ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एल्विश यादव मंगळवारी रात्री उशिरा नोएडा पोलिसांसमोर हजर झाल्याची माहिती समोर आली आहे. मीडियापासून वाचण्यासाठी एल्विश यादव गुपचूप पोलिस ठाणे गाठले होते.

एल्विश यादवची सेक्टर-२० पोलिस ठाण्यात सुमारे ३ तास चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला जाण्याची परवानगी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एल्विश यादवची आज पुन्हा चौकशी होऊ शकते. नोएडा पोलिसांनी एल्विश यादवला रेव्ह पार्टी प्रकरणात चालू असलेल्या तपासात सामील होण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिताच्या कलम ४१ अंतर्गत नोटीस पाठवली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR