छत्रपती संभाजीनगर बनतेय बांगलादेशी मुलींच्या तस्करीचे केंद्र?

छत्रपती संभाजीनगर : बांगलादेशातील दोन वीस वर्षांच्या मुलींची पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश मार्गे शहरात तस्करी केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोघींची गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी शाखेकडून कसून चौकशी करण्यात आली. मात्र, त्यांना शहरात का आणण्यात आले, याचा गुन्ह्यात उल्लेख नसल्याने त्याचे कारण गुलदस्त्यात आहे. त्यांना अवैधरीत्या हॉटेलमध्ये ठेवल्याप्रकरणी हॉटेलचालक आकाश नाना त्रिभुवन (वय २९, रा. आंबेडकरनगर) याच्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बीड बायपासवरील व्हाईट हाऊस लॉजमध्ये दोन बांगलादेशी तरुणी वास्तव्यास असल्याची माहिती शहर पोलिस दलाच्या दहशतवाद विरोधी कक्षाला मिळाली होती. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या सूचनेवरून कक्षाचे प्रमुख पोलिस निरीक्षक राजेश मयेकर, सहायक निरीक्षक अनिल कंकाळ, उपनिरीक्षक संदीप काळे यांनी १९ जानेवारी रोजी रात्री १० वाजता सहका-यांसह तेथे छापा टाकला. त्यात बांगलादेशी वीस वर्षांच्या दोन मुली आढळल्या. महिला अधिका-यांनी दोघींना ताब्यात घेतले.

दोन्ही मुलींच्या बांगलादेशमधील कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. चौकशीतील त्यांच्या दाव्यानुसार, चार ते पाच महिन्यांपूर्वी त्यांनी नदीमार्गेे देशाची सीमा ओलांडून, लष्कराच्या गस्ती पथकाची नजर चुकवून भारतात प्रवेश केला. पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशमध्ये काही दिवस वास्तव्य केल्यानंतर त्यांना दोन महिन्यांपूर्वी वाळुजमधील हॉटेलमध्ये आणण्यात आले. त्यानंतर पाच दिवसांपूर्वीच तस्करांनी त्यांना गांधेली फाटा परिसरातील व्हॉईट हाऊस लॉजिंगमध्ये नेले होते. मात्र, त्यांना देशात, शहरात आणण्याचा उद्देश काय, कोणी आणले, याचा मात्र उलगडा होऊ शकला नाही. त्यांच्याकडे आढळलेल्या कागदपत्रांची पोलिस चौकशी करत आहेत.

तस्करीसाठी शहर कायमच केंद्रस्थानी
– मे २०२५ मध्ये झाल्टा फाटा परिसरात बांगलादेशी मुलींना देहविक्रीसाठी तस्करी करून आणण्यात आले होते. यात हॉटेलचालक अभिजित बाळासाहेब जाधव (मूळ रा. घनसावंगी) याला अटक झाली होती.
– जानेवारी २०२४ मध्ये कोलकाता, पुणे मार्गे शहरात १६ वर्षीय बांगलादेशी मुलीची तस्करी करण्यात आली होती.
– विधान परिषदेच्या उपसभापती यांनी १९ सप्टेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर बांगलादेशी मुलींच्या तस्करीचे केंद्र बनल्याच्या मुद्द्यावरून चिंता व्यक्त केली होती.

एटीएस, स्थानिक पोलिस अनभिज्ञ?
अवैधरीत्या शहरात वास्तव्य करणा-या नागरिकांबाबत माहिती मिळवून कारवाई करण्याची जबाबदारी मुख्यत्वे दहशतवादी विरोधी पथकाकडे (एटीएस) असते. एटीएसकडून मात्र केवळ व्हीआयपींच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवरच हॉटेल, लॉजिंगची तपासणी करून याबाबत माहिती मिळवली जाते. शिवाय, दोन मुली वाळुजच्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होत्या, तरीही वाळुज, एमआयडीसी वाळुज पोलिसांना याबाबत काहीच कल्पना नसल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news