पंतप्रधान मोदींमुळेच पुतिन यांनी युक्रेनवरील अणुहल्ला रोखला

मॉस्को : युक्रेन युद्धादरम्यान २०२२ च्या शेवटी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना धोरणात्मक अणुशस्त्रांचा वापर करण्यापासून रोखण्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती, असा दावा पोलंडचे उपपरराष्ट्र मंत्री व्लादिस्लाव थियोफिल बार्टोशेव्स्की यांनी केला आहे. नवी दिल्लीत भारत-पोलंड संयुक्त आर्थिक आयोगाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बार्टोशेवस्की बोलत होते.

भारताचे अनेक दशकांपासून मॉस्कोबरोबर चांगले संबंध आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे अशा मोजक्या जागतिक नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांचा सल्ला पुतीन गांभीर्याने घेतात असे बार्टोशेवस्की यांनी सांगितलं. बार्टोशेवस्की म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक अत्यंत सुप्रसिद्ध आणि आदरणीय जागतिक नेते आहेत. भारताचे रशियन फेडरेशनशी आणि त्यापूर्वी सोव्हिएत युनियनशी दीर्घकाळापासूनचे संबंध आहेत. राष्ट्राध्यक्ष पुतीन हे प्रत्यक्षात पंतप्रधान मोदी यांच्या बोलण्याकडे लक्ष देतात. पंतप्रधान मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्धाच्या एका अत्यंत कठीण प्रसंगी आपल्या प्रभावाचं दर्शन घडवलं होतं, असं सांगत ते पुढे म्हणाले, मी २०२२ च्या अखेरीस युक्रेनमध्ये पुतीन यांना धोरणात्मक अणुशस्त्रांचा वापर करण्यापासून रोखण्यात पंतप्रधान मोदींनी बजावली होती. पंतप्रधान मोदी हे अशा मोजक्या व्यक्तींपैकी एक आहेत जे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर खरोखरच काही प्रमाणात दबाव आणि प्रभाव टाकू शकतात. रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याकरता नरेंद्र मोदींनी मदत केली होती.

सप्टेंबर २०२२ मध्ये उझबेकिस्तानमधील शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान पुतीन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी आजचे युग हे युद्धाचे नाही असे स्पष्टपणे सांगितलं होतं. तेव्हापासून भारताने रशियाविरुद्ध पाश्चात्य देशांनी घातलेल्या निर्बंधांमध्ये सामील होण्यास नकार दिला असून, संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की या दोघांशीही संपर्क कायम ठेवला आहे. त्यांनी २०२४ मध्ये कीव्ह येथे आणि त्यानंतर विविध बहुपक्षीय परिषदांदरम्यान झेलेन्स्की यांची भेट घेतली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|गटप्रवर्तक महिलांचे आशाताई भिसे यांना साकडे
06:36
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25

Latest news