तिकिट बुकिंगची प्रक्रिया अधिक सोपी, वेगवान, सुरक्षित!

मुंबई : प्रतिनिधी
रेल्वे तिकिटाचे ऑनलाईन आरक्षण करताना येणारे अनावश्यक पॉपअप्स, वारंवार भरावा लागणारा कॅप्चा आणि तिकीट बुक होण्यासाठी लागणारा प्रदीर्घ वेळ यामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांचा हा त्रास कायमचा दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आयआरसीटीसीच्या तिकिट बुकिंग सुविधेत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तिकिट बुकिंगची प्रक्रिया अधिक सोपी, वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाची एक सुधारित बीटा आवृत्ती तयार करण्यात आली असून, ती लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

काही दिवसांपूर्वी जयपूर येथील मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरील अनेक गंभीर त्रुटी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. यानंतर रेल्वेने तातडीने पावले उचलत १५ जुलैपर्यंत या संकेतस्थळात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आयआरसीटीसी आणि रेल्वे सूचना प्रणाली केंद्राच्या अधिका-यांनी जयपूरमध्ये या विद्यार्थ्यांसमोर नवीन संकेतस्थळाची बीटा आवृत्ती सादर केली असून त्यावर विद्यार्थ्यांचे अभिप्राय मागवले आहेत.

प्रवाशांचा बुकिंगचा अनुभव सुलभ करण्यासाठी नवीन आवृत्तीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यात तिकीट बुक करताना मध्येच येणारे अनावश्यक कॅप्चा, पॉपअप्स आणि जड ग्राफिक्स काढून टाकण्यात आले आहेत. प्रवाशांना आता सर्व वर्गांमधील उपलब्ध जागांची माहिती वेगवेगळ््या पर्यायांवर न जाता एकाच स्क्रीनवर पाहता येईल. तिकीट बुक करण्यासाठी लागणा-या पाय-या कमी करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे अवघ्या काही सेकंदांत तिकिट बुक होईल. जे प्रवासी वारंवार प्रवास करतात, त्यांना प्रवाशांची माहिती पुन्हा पुन्हा टाईप करावी लागणार नाही. ती माहिती एकदाच सेव्ह राहील.

आरक्षण यंत्रणेचा कायापालट
आयआरसीटीसीचे हे नवीन संकेतस्थळ रेल्वेच्या जवळपास ४० वर्षे जुन्या पॅसेंजर रिझर्व्हेशन इंजिन या प्रणालीशी जोडण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. ही जुनी आरक्षण यंत्रणा समांतर पद्धतीने पूर्णपणे अपडेट केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण क्षमतेने काम करणारे हे नवीन आयआरसीटीसी पोर्टल पुढील काही महिन्यांत अधिकृतपणे लाँच केले जाईल, असे रेल्वे अधिका-यांनी स्पष्ट केले.

देशातील सर्वांत मोठे तिकिट बुकिंग अ‍ॅप
रेल्वेच्या अधिकृत रेलवन या अ‍ॅपने ४ कोटी डाउनलोड्सचा टप्पा पार केला असून, ते देशातील सर्वात मोठे रेल्वे तिकीट बुकिंग अ‍ॅप बनले आहे. या अ‍ॅपवर तात्काळ बुकिंगच्या वेळी होणारा बॉट्सचा बेकायदेशीर वापर रोखण्यासाठीही रेल्वे विशेष सुरक्षा यंत्रणा राबवत आहे. हे सर्व महत्त्वाचे बदल मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण सूचनांमुळेच शक्य झाल्याचे रेल्वे अधिका-यांनी आवर्जून नमूद केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|गटप्रवर्तक महिलांचे आशाताई भिसे यांना साकडे
06:36
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25

Latest news