17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeराष्ट्रीयजयशंकर यांनी घेतली नौदल अधिका-यांच्या कुटुंबियांची भेट

जयशंकर यांनी घेतली नौदल अधिका-यांच्या कुटुंबियांची भेट

नवी दिल्ली : कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपावरून मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेल्या नौदल अधिका-यांच्या कुटुंबियांची परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज भेट घेतली. तसेच, या अधिका-यांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही परराष्ट्र मंत्र्यांनी या भेटीदरम्यान सांगितले.

भारतीय नौदलाचे आठ माजी अधिकारी ऑगस्ट २०२२ पासून कतारच्या तुरुंगात आहेत. कतारमधील अल दहरा या खासगी कंपनीसाठी काम करत होते. या सर्वांवर कतार प्रशासनाने इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप ठेवून तुरुंगात डांबले होते. कतारच्या न्यायालयाने या आठही जणांना हेरगिरीच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर खळबळ उडाली आहे. या आठ नौदल अधिका-यांमध्ये कॅप्टन नवतेजसिंह गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कॅप्टन विरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश यांच्यासह राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आलेले निवृत्त कमांडर पूर्णांदू तिवारी यांचाही समावेश आहे. २०१९ मध्ये त्यांना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

कुटुंबांची चिंता आणि जाणीव
जयशंकर यांनी म्हटले की, कतारमध्ये अटकेत असलेल्या आठ भारतीयांच्या कुटुंबीयांची आज सकाळी भेट घेतली. भारत सरकार या विषयाला सर्वाधिक महत्त्व देत असल्याचे या कुटुंबियांना सांगितले. सर्व कुटुंबियांच्या कुटुंबांची चिंता आणि वेदनांची जाणीव असून या अधिका-यांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत राहील, असे आश्वासन कुटुंबीयांना दिले. या प्रकरणात सर्व कुटुंबियांशी समन्वय राखण्यात येईल असे देखील परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR