27.9 C
Latur
Tuesday, May 14, 2024
HomeUncategorized१६ महिन्याच्या मुलीला घरी सोडून सुट्टीवर गेलेल्या आईला जन्मठेप

१६ महिन्याच्या मुलीला घरी सोडून सुट्टीवर गेलेल्या आईला जन्मठेप

 

वॉशिंग्टन : आपल्या चिमुकलीला घरी ठेवून १० दिवस सुट्टीला गेलेल्या अमेरिकेतील एका महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ३२ वर्षीय महिला आपल्या १६ महिन्याच्या लहान मुलीला घरी ठेवून सुट्टीसाठी गेली होती. फॉक्स न्यूजनुसार, महिलेचे नाव क्रिस्टेल आहे. गेल्या महिन्यात महिलेला हत्या आणि बाळाचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.

महिलेने सर्वात मोठा द्रोह केला आहे. तिने आपली चिमुकली मुलगी जैलिनला गेल्या उन्हाळ्यात अन्न-पाण्याशिवाय घरात एकटे सोडले. तिला सुट्टीसाठी डेट्रोईट, पोर्तु रिको येथे जाता यावे यासाठी तिने आपल्या बाळाला मरण्यास सोडून दिले, असे याप्रकरणी सुनावणी करणारे न्यायमूर्ती म्हणाले.

ज्या पद्धतीने तू आपली मुलगी जैलिनला घरी बंद ठेवले, त्याच पद्धतीने आता तुला देखील तुझे आयुष्य तुरुंगाच्या चार भिंतीमध्ये घालवावे लागेल. कोणत्याही स्वातंत्र्याशिवाय तुला राहावे लागेल. फक्त एक फरक असेल की तुला तुरुंगामध्ये किमान अन्न-पाणी मिळेल जे तू तुझ्या मुलीला नाकारले होते, असं म्हणत न्यायमूर्ती ब्रँडन शिहान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सीपीडीच्या होमोसाईड युनिटने याप्रकरणी तपास केला. त्यांनी सांगितले की, क्रिस्टेल हिने आपल्या मुलीला एकटे सोडून ६ जून ते १६ जून या कालावधीत डेट्रोईट, पोर्तु रिको, मिशिगण येथे सुट्ट्या घालवल्या. याकाळात जैलिन पूर्णपणे उपाशी राहिली अन् तिचा मृत्यू झाला. जैलिन घरी एका कोप-यात मृतावस्थेत पडली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR