33.2 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमनोरंजन‘जी ले जरा’ चित्रपटासाठी प्रियंका पोहोचली फरहानच्या घरी

‘जी ले जरा’ चित्रपटासाठी प्रियंका पोहोचली फरहानच्या घरी

मुंबई : देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या तिचा पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत भारतात आहे. प्रियंका होळी उत्सव साजरा करण्यासाठी भारतात परतल्याचे बोलले जात आहे. लग्नझाल्यापासून प्रियंका बॉलिवूड पासून ब-याच काळापासून दूर आहे. अशातच प्रियंका तिच्या पतीसोबत फरहान अख्तरच्या घरी जाताना दिसली आहे. याच एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रियंकाचे चाहते ‘ जी ले जरा’ चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे का? असा प्रश्न विचारत आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोमवारी तिचा पॉप स्टार पती निक जोनाससोबत चित्रपट निमार्ते फरहान अख्तरच्या घरी भेट देताना दिसली, ज्यांच्यासोबत तिने ‘डॉन ’आणि ‘डॉन २’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दरम्यान, २०२१ साली फरहानने आलिया भट्ट कतरिना आणि प्रियंकाला घेऊन ‘जी ले जरा’ या चित्रपटाची घोषणा केली होती. मात्र, यानंतर चित्रपटाबद्दल कोणतीच माहिती समोर आली नाही. अशातच प्रियांकाने फरहानच्या घरी भेट दिली .

असे समजताच प्रियंकाच्या चाहत्यांनी ‘जी ले जराची’ चर्चा पुन्हा सुरू केली आहे. प्रियंकाने फरहानची भेट घेतली तेंव्हा फरहानचा एक्सेल एंटरटेनमेंटचा बिझनेस पार्टनर रितेश सिधवानी देखील त्याच्या घरी उपस्थित होता, यामुळे ‘जी ले जरा’ चित्रपटावर काम करण्यास सुरूवात होणार अशी चर्चा होत आहे, अशातच प्रियंकाच्या तारखा मिळण्यास विलंब होत असल्याने फरहान सुरूवातीला रणवीर सिंगला घेऊन डॉन ३ बनवणार आहे. असे सुत्रांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR