Homeमहाराष्ट्रकोल्हापुरातील सावकाराच्या कांडाने महाराष्ट्र हादरला

कोल्हापुरातील सावकाराच्या कांडाने महाराष्ट्र हादरला

मोबाईलमध्ये २०० ते ३०० अश्लील व्हिडिओ, अनेक महिलांवर अत्याचार

कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापुरात सावकार अमित सावंतने व्याजासाठी महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या दाव्यानुसार, सावंतने अशा अनेक असहाय्य महिलांचे लैंगिक शोषण केले असून, त्याच्या मोबाईलमध्ये २०० ते ३०० अश्लील व्हिडीओ आहेत. गांधीनगर पोलिसांनी सावंतला अटक केली असून, या प्रकरणी इतर महिलांनीही पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे. हे प्रकरण महाराष्ट्रात खळबळ उडवत आहे.

नाशिकमध्ये सध्या भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे आणि अश्लील कृत्य समोर आल्यानंतर अख्खे राज्य हादरले. त्याचे हे प्रकरण गाजत असतानाच आता आणखी एका कांडाने महाराष्ट्राला हादरा बसला आहे. व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात घडल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी संबंधित सावकार अमित सावंत याच्यावर कोल्हापूरच्या गांधीनगर पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र त्याच्या मोबाईलमध्ये नको त्या गोष्टी असल्याचा दावा पीडित महिलेने केल्याने आणखीनच मोठी खळबळ माजली आहे. सावकार अमित सावंत याने फक्त या एकाच महिलेवर नव्हे तर अनेक असहाय्य महिलांवर अत्याचार केले असून, त्याचे घाणेरडे, अश्लील २०० ते ३०० व्हिडिओ या सावकाराच्या मोबाईल मध्ये असल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे.

व्याज परत केले नाही म्हणून महिलेवर अत्याचार
पोलिसांच्या ताब्यात असलेला अमित सावंत हा पेशाने कारचालक असला तरी तो खाजगी सावकारी देखील करतो. यातूनच कोल्हापूर जवळील गडमुडशिंगी गावात राहणा-या एका महिलेची त्याच्याशी ओळख झाली. संबंधित महिलेला पैशांची गरज असल्यामुळे दोन वर्षांपूर्वी तिने सावंत यांच्याकडून दहा टक्के दोन लाख रुपये व्याजाने घेतले. महिलेला सावंत याच्याकडे व्याज भरणं शक्य झाले नाही. मात्र याचा गैरफायदा घेत अमित सावंत हा संबंधित महिलेच्या घरी गेला आणि त्याने या महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केले. एवढंच नव्हे तर या घटनेचा त्याने व्हिडिओ देखील शूट केला. अखेर या पीडित महिलेने गांधीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत, अमित सावंत याच्या गैरकृत्याचा पाढा वाचला. गांधीनगर पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अमित सावंत याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करत त्याला अटक देखील केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR