पेरूमध्ये मोठा अपघात! पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले; १३ ठार

नाझ्का : वृत्तसंस्था
पेरूमधील नाझ्का शहराबाहेर पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले आहे. ज्यात १३ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी हे विमान पर्यटकांना नाझ्का लाईन्स पाहण्यासाठी घेऊन जात होते असे नाझ्का शहर प्रशासनाने म्हटले आहे. नाझ्का लाईन्स म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी पेरूच्या स्थानिक लोकांनी वाळवंटात कोरलेल्या भू-चित्रांचा एक संच आहे. या रेषा प्राण्यांच्या आकृत्या तयार करतात, ज्या केवळ विमानातून किंवा मनो-यातूनच पूर्णपणे पाहता येतात.

नाझ्का सरकारने सांगितले की, या विमानाने जवळच्या इका शहरातून उड्डाण घेतले होते. पेरूची कंपनी एरोडियानाद्वारे हे विमान चालवले जात होते. ही कंपनी गेल्या १४ वर्षांपासून सेसना ग्रँड कॅराव्हॅन विमानांचा वापर करून नाझ्का लाइन्सवर निसर्गरम्य हवाई सफरी आयोजित करत आहे. आता या अपघाताची चौकशी सुरू आहे असे पेरूच्या अधिका-यांनी सांगितले. यावर तात्काळ प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

अपघातग्रस्त विमान पेरूच्या ‘एरोडियाना’ या विमान कंपनीचे होते. हे विमान नाझ्का लाइन्स पाहण्यासाठी पिस्को विमानतळावरून निघाले होते, परंतु उड्डाणानंतर काही मिनिटांतच नियंत्रण कक्षाशी त्याचा संपर्क तुटला असे स्थानिक अधिका-यांनी सांगितले. अद्याप या अपघाताचे कारण समजले नाही. सध्या तपास सुरू करण्यात आला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हीडीओंमध्ये अपघातस्थळी धूर निघताना आणि विमानाचे अवशेष एका कोरड्या शेतात विखुरलेले दिसत होते. या व्हीडीओंची स्वतंत्रपणे पडताळणी करता आली नाही.

नाझ्का लाइन्स या पर्यटनस्थळाचा युनेस्कोच्या यादीत समावेश असून ते पुरातत्व स्थळ आहे. तिथे वाळवंटात कोरलेल्या मोठ्या, प्राचीन भू-चित्रांचा संग्रह आहे. दरवर्षी जवळपास १ लाखाहून अधिक पर्यटक या स्थळाला भेट देतात. त्यापैकी बहुतेक जण लहान विमानांमधून प्रवास करतात. अपघाताच्या आदल्या दिवशी ताशी ४० किमी पेक्षा जास्त वेगाने वाहणा-या वा-यामुळे धूळ उडत होती आणि दृश्यमानता कमी झाली होती, त्यामुळे जवळच्या मारिया रिचे विमानतळावरून होणारी हवाई उड्डाणे रद्द करण्यात आली होती. खराब हवामानामुळे पर्यटकांना घेऊन जाणारी दोन विमाने मार्कोना विमानतळाकडे वळवण्यात आली होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59
Video thumbnail
Parbhani|थारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांचा खुनाचा आरोप
03:58

Latest news